पुनाळ । प्रतिनिधी:(सुरेश वडर ): काव्यांगण समूह नागपूर द्वारा आयोजित काव्यधारा राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धा 2021 या मध्ये कोतोली (ता.पन्हाळा) येथील परशुराम कांबळे यांच्या मायबाप या रचनेस उत्कृष्ट क्रमांक मिळाला व पुनाळ(ता.पन्हाळा) येथील सुरेश वडर यांच्या पंढरीची वारी या रचनेस लक्षवेधी क्रमांक मिळाला.
सदर स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा काव्यांगण व्हाट्सअप्प समूहात पार पडला.या स्पर्धेला संपुर्ण महाराष्ट्रातुन भरघोस प्रतीसाद मिळाला.दादासाहेब फाळके पुरस्कार 2021चा पुरस्कार प्राप्त स्वल्प विराम या माहितीपटाचे निर्माते मारोती मुरके नागपूर यांच्या शुभ हस्ते पूरस्कार वितरण करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी कवी हणमंत गोरे सोलापूर हे होते.प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ कवयत्री सुधा जाधव
कोल्हापूर,गझलकार सुरेशचंद्र म्हात्रे नवी मुंबई,जयश्री बापट पुणे हे होते.
अव्वल ठरलेल्या रचनांचे डिजिटल पोस्टर व सन्मानपत्र देऊन कवींना सन्मानित करण्यात आले.सुत्रसंचालन व प्रास्तविक काव्यांगण समूहाचे प्रमुख कमलेश सोनकुसळे यांनी केले.व अभार समूहाचृ विश्वस्त हरृशकुमार खैरे यांनी मानले.
परशुराम कांबळे
सुरेश वडर