shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हनुमान व्यायाम शाळा वडापुरी चे वस्ताद किरण गोसावी यांचा अभिष्टचिंतन मास्क वाटप करून साजरा.

हनुमान व्यायाम शाळा वडापुरी चे  वस्ताद किरण गोसावी यांचा अभिष्टचिंतन  मास्क वाटप करून साजरा.
मी मास्क घालीन व इतरांना मास्क घालण्यासाठी विनंती करेन असा संकल्प हनुमान व्यायाम शाळेचे युवक सभासदांनी संकल्प यावेळी केला.
इंदापूर:(दि.२६ जून २०२१) वडापुरी येथे हनुमान व्यायाम शाळेचे संस्थापक अध्यक्ष वस्ताद किरण गोसावी यांचा अभिष्टचिंतन दिनी  उपस्थित युवक व ज्येष्ठ व्यक्तींना मास्क वाटप करून साजरा करण्यात आला .असून यावेळी मी मास्क घालीन व इतरांना मास्क घालण्यासाठी विनंती करेन असा संकल्प हनुमान व्यायामशाळेचे युवक सभासदांनी संकल्प  केला.
वडापुरी पंचक्रोशीतील युवकांना सक्षम सुदृढ बनवण्यासाठी व्यायामशाळेची गरज लक्षात घेता. वस्ताद किरण गोसावी यांनी ग्रामीण भागात प्रथम प्रशिक्षण घेऊन आपल्या सहकाऱ्यांना तंदुरुस्त घडवण्यासाठी प्राथमिक शाळेत जिम चालू केली .आणि यातून त्यांनी दोन वर्षापासून अद्यावत हनुमान व्यायाम शाळा फिटनेस क्लब याची उभारणी केली. या माध्यमातून सध्याच्या कोरोणा काळात या युवकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती गरज असताना याची मदत या व्यायामशाळेच्या माध्यमामुळे युवकांमध्ये निर्माण झाली. तसेच वस्ताद किरण गोसावी हे नेहमी विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजातील तरुणांमध्ये संस्कारक्षम आदर्श निर्माण करण्याचे कार्य करत असल्याचे दिसते. त्यांचा आजचा अभिष्टचिंतन दिनी  सध्या कोरोना काळात सक्षम संरक्षण म्हणून मास्क वाटपाचे उपक्रम करण्यात आला. यामध्ये तरुणांना व ज्येष्ठांना मास्क वाटप केले. तरुणांमध्ये हा एक आदर्श ठरला असल्याचे व्यायाम शाळेची मार्गदर्शक राजू गोसावी यांनी या वेळी मत व्यक्त केले.
close