शेवगाव । प्रतिनिधी :-
शेवगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये 171 वा साप्ताहिक शिव अभिषेक सोहळा औंढा नागनाथ जवळील भारतीय संस्थान मठाधिपती प.पु सोमेश्वरजी महाराज भारती यांच्या हस्ते संपन्न झाला.
या वेळी दिवाळीचा पहिला दिवा शिव छत्रपती चरणी या उपक्रमा अंतर्गत दिप उत्सव साजरा केला. यावेळी मराठा भुषण चंद्रकांत महाराज लबडे, भापकर सरपंच,काटे सर, प्रशांत लबडे पाटील, ऋषिकेश भापकर, अमोल घोलप, कृष्णा मडके,राम साळुंके, डॉ देहाडराय,किशोर वाघ, भाऊसाहेब लबडे, नितीन गटकळ, अर्जुन बढे,निखिल पवार, प्रदिप जाधव,वैभव खरात,अभय गोरे, साहेबराव काकडे,महेश लबडे आदी उपस्थित होते.