प्रतिनिधी : किशोर चाकोते
साकत :१७ / नगर तालुक्यातील साकत खुर्द येथील सार्वजनिक वाचनालय या ठिकाणी आज दिवंगत ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त साकत येथे शालेय विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित वाचन दिन साजरा करण्यात आला .
अब्दुल कलाम हे एक भारतीय एरोस्पेस शास्त्रज्ञ होते.तसेच त्यांनी २००२ ते २००७ या काळात भारताचे ११ वे राष्ट्रपती म्हणून देखील काम केले होते.कलाम हे तमिळनाडूच्या रामेश्वर येथे लहानाचे मोठे झाले आणि तेथेच त्यांनी भौतिकशास्त्र आणि एरोस्पेस अभियांत्रिकी अभ्यास केला. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस हा देशभर वाचन दिन म्हणून साजरा केला जातो.
या वेळी श्री राम मंदिर देवस्थान ट्रस्टचे संस्थापक नाना गायकवाड माजी सरपंच श्रीधर पवार , सामाजिक कार्यकर्ते शिवा म्हस्के, ग्रंथालयपाल अनिल पवार,राजाबाबु निमसे,भोसले मेजेर,प्रदीप बोचरे, दादा पवार,संदीप मुगसे, नसीर शेख आदी मान्यवर उपस्थित होते.