प्रतिनिधी : शिवा म्हस्के
नगर : १७ / औरंगाबाद महामार्गवर शेंडी बायपास चौकांत दुचाकीला आज सायंकाळी चार सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर टेम्पो पाठीमागील बाजुने दुचाकीस्वार दाम्पत्याला जोरदार धडा दिल्याने या मध्ये तिनं वर्षाचे बालक जागीच ठार झाले.
सविस्तर माहिती प्रमाणे जेऊर (बहिरवाडी) येथील रहिवासी संतोष काळे (वय ३३)आपल्या कामानिमित्ताने दुचाकीवरून नगर दिशेने येत असताना पाठीमागून मागुन येणाऱ्या आयश टेम्पो जोराची धडक दिल्याने यांत संतोष काळे यांचा तिनं वर्ष मुलगा जागीच ठार झाला आहे. तसेच काळे यांना जोरदार धडकेने मोठ्या प्रमाणावर मार लागला आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभाग उपाचार चालू आहे.यात सोनाली संतोष काळे (वय३०) व लहान मुलगी किरकोळ जखमी आहे. खाजगी हाॅस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत.
अपघातग्रस्त नंतर टेम्पो चालकाने घटनास्थळवरुन टेम्पो न थांबवता धरधाव वेगाने एम आयडीसी कडे टेम्पो पळवला स्थानिक नागरिकांनी टेम्पो पाठलाग करत टेम्पो चालकांना पकडण्यात यश आले. अपघातग्रस्त नंतर या ठिकाणी संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केला. औरंगाबाद महामार्गवर वाहतूक जाम झाली होती. घटनास्थळी पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली होती.
शेंडी बायपास रस्ता पोलिस चौकी उभारलेली आहे. या ठिकाणी जड वाहतूक नियंत्रण साठी वाहतूक पोलीस नेमणूक करण्यात आली आहे. परंतु या ठिकाणावरून शंभर दोनशे रुपये घेऊन सरास पणे शहरात जड वाहनांना प्रवेश दिला जातो. तरी रस्ता मध्ये भागी पोलिस चौकी हटवण्यात यावी नागरीकांची व ग्रामस्थांची मागणी आहे .
गोवंशाच जातीचे जनवारे कत्तल साठी घेऊन जाताना बजरंग दल आढळून आल्याने या गाडी पाठलाग करताना सदर गाडी अपघातग्रस्त झाली त्यातील जनावरे क्रेन साह्याने वर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.