शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह नेटवर्क
भोसरी:- विद्यार्थ्यांना आपल्या सणांविषयी माहिती व्हावी,आपल्या परंपरा समजाव्यात'संस्कृतीची ओळख व्हावी, चांगले संस्कार व्हावे, आदर्श, नित्य मूल्य रुजावीत, कलाविष्कारांची निर्मिती व्हावी, स्वकृतीचा आनंद मिळवा, कल्पनाशक्तीचा विकास व्हावा, या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दि १७/१०/२०२२ ते २०/१०/२०२२ या कालावधीत शाळेमध्ये दररोजसकाळी १०:०० ते ११:३० या वेळेत दीपावली"निमित्त छोट्या चिमुकल्यांसाठी विविध गोष्टी बनविण्याचे प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यक्रमात चिमुकले विद्यार्थी मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने सहभागी झाले होते. त्यांच्या पालकांकडून सुद्धा लागणाऱ्या विविध वस्तू मोठ्या आनंदाने पुरविण्यात येत होत्या.
"दीपावली "निमित्त आयोजित प्रात्यक्षिक/ प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये
१) पणतीची सजावट करणे
) आकाश कंदील बनवणे
) किल्ला तयार करणे
यांचे प्रशिक्षण प्रात्यक्षिकासहविद्यार्थ्यांना प्रशिक्षित शिक्षकांकडून देण्यात आले. विद्यार्थ्यांकडून प्रशिक्षणातून तयार झालेल्या विविध कलाकृती पाहण्यासारख्या होत्या.
कार्यक्रमाचे संयोजन: नारायण हट शिक्षण संस्थेचे सचिव: प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे अध्यक्ष: संदीप बेंडुरे, अंकुशराव गोरडे,डॉ. वसंतराव गावडे, डॉ. सुयोगकुमार तारळकर, शिवराम काळे, रोहिदास गैंद, मनोज पवार, डॉ. शरद कदम , संजय सांगळे, मुकुंद आवटे,उज्वला थिटे, शोभा आरुडे, रोहिणी पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या प्राचार्या, विजया चौगुले, मालती माने,प्रतिभा तांबे, मीनल पाटील, सायली संत, सुरेखाताई मुके, श्री प्रवीण भाकड यांनी केले.
शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांवर विविध संस्कार करण्याचे दृष्टिकोनातून वेगवेगळे उपक्रम शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवले जात आहेत. त्यामुळे शिक्षणाचा मूळ उद्देश साध्य होताना दिसून येत आहे. दीपावलीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम राबवून शाळेने एक वेगळा ठसा निर्माण केला आहे.