महाराष्ट्र मध्ये सर्व शासकीय कर्मचारी यांना बोनस मिळत असताना मात्र अनेक वर्षे झाले पोलिसाना बोनस मिळत नाही,हा अन्याय असून,पोलिसांना बोनस
मिळावा याबाबत आपणास पत्र लिहिले आहे.
इतर शासकीय कर्मचारी यांना 5 दिवसाचा आठवडा
असतो,पोलिसांना मात्र 24 तास ड्युटी असते आणि रोज रोज 12 ते 15 तास ड्युटी करावी लागते स्वतःच्या तबेती कडे व कुटुंबा कडे दुर्लक्ष होते,शांतता व सुव्यवस्थाची जवाबदारी रात्रंदिवस त्यांच्या खांद्यावर असते,याबरोबर सणसुद,मोर्चे,आंदोलने,मंत्र्यांचे दौरे,व्ही आय पी बंदोबस्त,त्याच बरोबर आपत्कालीन संकटे,पाऊस,यासाठी पोलिसांना जुंपले जाते,गेल्या कोरोना काळात तर सर्व जवाबदारी पोलिसनावर टाकण्यात आली,गर्दीवर नियंत्रण टेवण्यापासून ते ऍम्ब्युलन्स मिळवून देण्यापर्यन्त सर्व कामे पोलिसांना करावी लागली.
कोरोनामुळे अनेक पोलीसांना आपला जीव गमवावा लागला.पोलीसांमुळे कोरोना आटोक्यात आला. महाराष्ट्राच्या सुरक्षेची सर्व भिस्त पोलीसांवर असताना मात्र त्यांना बोनस पासून डावलण्यात येते. पोलीसांना संघटना नसल्यामुळे, त्यांना आवाज उठवता येत नाही. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो. विरोधी पक्ष यावर आवाज उठवतात, मात्र ते स्वत: सत्तेत आल्यावर सोईस्करपणे हा विषय सोडून देतात. इतर कुठल्याही शासकीय कामात जीवाची जोखीम नसते. मात्र पोलीसांना जीवाची जोखीम घेऊन काम करावे लागते. सर्वांना बोनस मिळत असताना पोलीसांना डावलणे हे बरोबर आहे का? सर्व म्हणतात हे जनतेचे सरकार आहे.
तर मग पोलीसांना त्वरीत महिन्याचा बोनस जाहीर करावा अन्यथा भारतीय राष्ट्रवादी पार्टी तर्फे तीव्र आंदोलन महाराष्ट्र भर केले जाईल असे निवेदन भारतीय राष्ट्रवादी पार्टी चे राष्ट्रीय युवा सचिव अजित संचेती यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,व देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री,गृहमंत्री यांना दिले आहे.