shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दिपावली निमित्त हेमंत मुसरीफ यांच्या छान छान कविता..!

1)
धनत्रयोदशी ..

आश्विन वद्य त्रयोदशी
म्हणेतया धनत्रयोदशी
लक्ष्मीस मानूनि  आई 
पूजन करी या दिवशी

देवतांचा वैद्य धन्वंतरी 
जयंती ती  या  दिवशी 
सुआरोग्य  लाभो सर्वां
अमृतअसे त्या कलशी

कणीकदीप तेरा लावी
तोंड करावे  दक्षिणेशी
यम  दीप  दाना महत्त्व 
अपमृत्यू न ये  कुणासी

मुहूर्ता  असे  मान  खूप 
व्यापारी पाहे रोजनिशी
किती सुख किती दु:ख
तपासतो तो जमा राशी

इप्सित ती लाभो खुशी
आनंद मिळे सकळाशी
निमित्ताने दिपावलीच्या
शुभेच्छांच्या बरसे राशी

सण आहे  निमित्तमात्र
माणूस हो  एकजिनसी
धर्म अर्थ शास्त्र  सांगड
भले असूद्या भिन्न मुशी


2)
नव धन्वंतरी  ..

समुद्र मंथनी उत्पत्ती
देवांचा वैद्य धन्वंतरी 
आरोग्य देई  सकळा
अमृतकुंभ तया करी

रूप घेवून डाॅक्टरांचे 
देवदूत येई धरतीवरी
धन तेरस  निमीत्ताने 
जयंती  करू साजरी 

संकट  नवे  जगावरी
कोरोनाची महा मारी 
रूपनवीन डाॅक्टरांचे 
जाणवले  ते परोपरी

परिश्रमे तया  केवळ
दिवाळी हो  घरो घरी 
उपकार  मानू  किती 
आरोग्य देई खरोखरी 

नाम  घेऊनि धन्वंतरी 
दीप एक  लाऊ  दारी
सर्वे  संतु :  निरामय :
रात्र नको ती  अंधारी

आरोग्य जागृती यावी
प्रकाश उजळो अंतरी
सुख समृद्धीची खात्री
निरंतर  देई  धन्वंतरी



3)
यम दीप. 

दिवाळी द्वितीय दिन 
असे धन्वंतरी जयंती 
समुद्र मंथनी प्रकटले
अमृत कलश ते हाती

देवतांचे  वैद्य  मानती
उपकार त्यांचे जगती
आरोग्य लाभावे सर्वां
दारी  लावावी  पणती

यम  दीप  दान करता
दूर पळूनि जाय भिती
अपमृत्यू  कुणा  नको
उजळो जीवन ज्योती

आरोग्य कर्मियांनी गा
जपावी सदैव रे  नीती
संन्मार्गाची चाड  ठेवा
हेच शिकविते संस्कृती

सत्कर्म घडो सत्संगती
एवढी  तुजला  विनंती 
दिपावली निमीत्त मात्र
जुळूनयावी छान नाती

मृत्यू  कुणा चुकला ना
लाभो मोक्षदायी शांती
गेल्यावरही यावी  सय
अशीलाभो देवा किर्ती 

- हेमंत मुसरीफ पुणे
  9730306996
 www.kavyakusum.com

close