shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वसुबारस निमित्ताने खास गायीची आरती 'आरती जय गोमाता'..!

(चाल : आरती ज्ञानराजा) 

आरती जय गोमाता 
तुझे चरणावरी माथा
अनंत उपकार 
कैसे सांग फेडू आता....१
आरती जय गोमाता....

 साधू संत तुज पुजिती, 
तूच वंदनीय माय! 
दुःख आणि दारिद्र्यही, 
तुझ्या दर्शनाने जाय ....२

शेतीसाठी बैल राबतो
सर्वा आनंदही देतो, 
धनधान्य पिकवितो
सुख समृद्धीचा दाता...३ 

पंचामृत पंचगव्य 
शेण गोमूत्र प्राशिता, 
आरोग्य पर्यावरण 
तुझ्याजवळी रहाता...४

दत्तापाशी तुझी छाया 
आम्हा सर्वावरी माया, 
दूध तूप पक्वान्नाने
सारी उजळते काया...५

संस्कृती आरोग्याचा 
स्त्रोत तुझ्या प्रांगणात, 
सान थोरा आता दे दे 
पोटभर आशीर्वाद ....६ 

रचनाकार : 
पुण्यरत्न चंद्रकांत शहासने.
मोबाईल : ९८८१३७३५८५
close