shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डी सेवा सोसायटी सभासदांना १५ टक्के लाभांश



शिर्डी प्रतिनिधी(संजय महाजन) ::-

शिर्डी वि. वि, का. सेवा सोसायटीच्यावतीने सभासदांची दिवाळी गोड करण्याकरिता सभासदांना १५ टक्के लाभांश व ठेवींवर ९ टक्के व्याज देण्याची परंपरा यावर्षीही सुरु ठेवण्यात आली.

संस्थेचे माजी चेअरमन स्व. नानासाहेब जगताप यांचे नावे गणेशचे व्हा. चेअरमन प्रतापराव जगताप यांनी रुपये १ लाख ठेव ठेवली आहे. या ठेवीवरील ९ हजार व्याज गरजू सभासदाला मदत म्हणून देण्यात येते त्याचे वितरण डॉ. धनंजय जगताप व ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते पुंजा काटकर यांना करण्यात आले.

सोसायटीच्या १ हजार ३४४ सभासदांच्या खात्यावर डिव्हिडंड म्हणून ९ लाख ६७ हजार ४३९ रुपये, ५६० सभासदांच्या खात्यावर ठेव व्याज म्हणून १ लाख ४२ हजार ६६५ अशी एकूण ११ लाख १० हजार १०५ रुपये सभासदांना दिवाळी भेट म्हणून देण्यात आले. डिव्हिडंड वितरण प्रसंगी शिर्डी सोसायटीचे चेअरमन विजयराव गोंदकर यांनी सांगितले, संस्थेचं ज्येष्ठ सभासद यशवंत कोते, मधुक कोते, यशवंत गायके, धनंजय जगताप एकनाथ शेळके, हरिभाऊ बनकर, राजें वाघ, रमेश कोते, नारायण गोदकर आद मान्यवरांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेश वितरण करण्यात आले.

ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्य मार्गदर्शनाखाली तसेच खा. डॉ. सुजर विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच वाटचाल उत्कृष्टपणे सुरू आहे.

याप्रसंगी संस्थेचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब रामचंद्र काटकर, संचालव बाळासाहेब जगताप, गोपीनाथ गोंदकर प्रमोद गोंदकर, तानाजी गोंदकर, विजय गायकवाड, किरण कोते, नितीन कोते विकास कोते, प्रमिला शेळके, सुनित कोते, आप्पासाहेब कोते, रवींद्र कोते सचिव संदीप बजे यांच्यासह संस्थेचं सभासद उपस्थित होते.
close