पुणे । प्रतिनिधी :-
अखिल वडार बोली साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यातर्फे दुसरे अखिल भारतीय वडार बोली साहित्य संमेलन रविवारी 30 ऑक्टोबर रोजी पुण्यातील येरवडा येथील गुंजन थिएटरजवळील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कला रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष पुणे महानगरपालिकेतील सुरक्षा अधिकारी राकेश विटकर यांनी दिली.
सदर संमेलन साहित्यामुळे समाजातील व्यक्तींना सुप्त गुणांना वाव मिळून समाज प्रबोधन व्हावे या उदात्त हेतूने या संमेलनाचे आयोजन केले असल्याचे ज्येष्ठ साहित्यिक आणि मावळते संमेलन अध्यक्ष टी. एस. चव्हाण यांनी सांगितले.
प्रारंभी सकाळी नऊ वाजता ध्वजपूजन व ग्रंथ दिंडीचे आयोजन केले असून त्याचे उद्घाटन उद्योजक राजाराम विटकर, माजी नगरसेवक किशोर विटकर, अशोक देवकर , मनोहर मुधोळकर, खजिनदार शांताराम मनवरे, अशोक विटकर यांच्या हस्ते होणार आहे .या दिंडीचा प्रारंभ येरवडा चौक ते अण्णाभाऊ साठे सभागृहापर्यंत राहील.या दिंडीत आळंदीचे ह भ प श्रीकृष्ण मोहिते यांचा टाळ- मृदुंग पथकासह वडारनारी जनशक्ती महिला सदस्या सहभागी होणार आहेत.
यानंतर संमेलनाचे उद्घाटन भारत सरकार नवी दिल्ली येथील भटके विमुक्त कल्याण बोर्डचे चेअरमन दादासाहेब इदाते व संमेलनाचे अध्यक्ष प्रा. शशिकांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. याप्रसंगी मावळते संमेलन अध्यक्ष टी. एस. चव्हाण, स्वागताध्यक्ष राकेश विटकर, दिल्ली विद्यापीठाचे वक्ते नारायण अप्पा, तमिळनाडू राज्यातील कामराज विद्यापीठाचे प्रा. उमा राज, मुंबई येथील पर्यावरण व वन विभागाचे अव्वर सचिव मनोहर बंदपट्टे, सोलापूर जिल्ह्याचे विशेष समाजकल्याण सहाय्यक आयुक्त नागेश चौगुले, तुरुंगाधिकारी सुवर्णा चौमुळे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार असून विशाखापट्टणमचे जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्या हस्ते गौरव अंक प्रकाशित करण्यात येणार आहे.
प्रारंभी सकाळी दहा वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात येणार असून यामध्ये शाहीर घनशाम जाधव, दीपेश पिटेकर, आकाश पवार, विजया गुंजाळ, अशोक बनकर, सुदर्शन पिटेकर, बाबासाहेब पवार आदींचे गायन तर श्रेया देवकर यांचे नृत्य सादरीकरण होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त समाजकल्याण आयुक्त आर. के. गायकवाड, ओ सी सी आय राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी शिवरुद्राय स्वामी, ओ सी सी आय राष्ट्रीय सल्लागार नरसिंहराव गुंजी, प्रा.डॉ. श्याम सुंदर , बालनरसिंहडू वड्डे, सत्यानंद पात्रोट , डॉ.बसवराज, ओ सी सी आय कर्नाटक प्रदेश अध्यक्ष एन. व्यंकटेश आदी उपस्थित राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून सिताराम शिंदे, राजाराम विटकर ,विनोद जाधव, जगन्नाथ फुलारे, शंकर चौगुले, नितीन धोत्रे, सुधीर पवार, कोळप्पा धोत्रे हे उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी सन्माननीय उपस्थिती म्हणून मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष व तळेगाव दाभाडेचे नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, अखिल महाराष्ट्र वडार समाज संघटनेचे प्रदेश सरचिटणीस शामराव पवार, वडार पॅंथर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दयानंद इरकल, ओ सी सी आय महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दीपक पवार, वडार समाज संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष श्रीकांत मुद्दे , विदर्भ वडार समाज संघटनेचे अध्यक्ष महादेव कुसाळकर, साहित्य मंडळाचे कार्याध्यक्ष मनोहर मुधोळकर, लक्ष्मी देरंगुला, संगीता पवार, अनिल जाधव, आनंद मंजाळकर, अपर्णा कुऱ्हाडे यांची उपस्थिती राहणार आहे. या पहिल्या सत्राचे प्रास्ताविक शांताराम मनवरे हे करणार असून सूत्रसंचालन सुरज मोरे, दीपेश पिटेकर,अशोक धोत्रे, रमेश कट्टीमन्नी हे करणार असून सुवर्णा देवकर या समारोप करतील.
त्यानंतर दुपारी बारा वाजता दुसऱ्या सत्रात माझी जडणघडण या विषयावर दिलीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली स्व कथन होणार आहे. यामध्ये प्रकाश शिंदे, बाबासाहेब धनवटे, रमेश कट्टीमनी, तुकाराम माने, प्रिया पोवार हे विचारवंत सहभागी होऊन आपले विचार मांडणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रावण रॅपनवाड, अमर कुसाळकर, दीपक शिंदे, कल्पना नलावडे, लक्ष्मणराव पवार, हनुमंत एबंडवार, निर्मला कुऱ्हाडे, सागर मोहिते उपस्थित राहणार असून या सत्राचे सूत्रसंचालन माधुरी डोंगरे, अशोक कुसाळकर, शेखर गाडीवडार, सुवर्णा देवकर हे करणार असून जयश्री देवकर या सत्राचे समारोप करतील.
तिसऱ्या सत्रात दुपारी साडेबारा वाजता आपलं जगणं, आमची मायबोली आणि आमचं साहित्य या विषयावर भारत धनवडे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार आहे. यामध्ये ललिता धनवटे, विजयालक्ष्मी गुंजाळ, अनिल जाधव, घनश्याम जाधव हे सहभागी होऊन आपले विचार मांडणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ.गजानन देवकर, किशन रॅपनवाड, सुखदेव फुलारे, दुर्गादास गुढे, बाबण्णा कुसाळकर, महेंद्र पवार ,निर्मला कुऱ्हाडे, शोभा माने हे उपस्थित राहतील. या सत्राचे सूत्रसंचालन दीपेश पिटेकर व प्रिया पवार हे करणार असून सुवर्णा देवकर या समारोप करतील.
चौथ्या सत्रामध्ये दुपारी दीड वाजता बाबाजी धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रा.डॉ. अशोक बंडगर, मानसी वडार यांच्या मार्गदर्शनानुसार काव्य संमेलन होईल. यामध्ये अजय बेळे,अर्जुन धोत्रे, वनिता निंबाळकर, सुरेश वडर, विजयालक्ष्मी गुंजाळ, सुवर्णा देवकर,वर्षा शेलार, जयश्री देवकर ,अंकिता कुसाळकर, रतन सावंत, नंदा इटकर, शारदा दिंडोरे, प्रिया पोवार, जयवंती पवार, सुनिता जाधव,घनश्याम जाधव, संग्रामसिंह धोत्रे, श्याम विटकर, सुरेश पवार, अनिल कलकुटकी, आकाश सुपारे, चंद्रकांत चौगुले, तुषार धोत्रे, विश्वजीत दुर्लेकर, अविनाश लष्करे, ऋषिकेश पवार, सचिन चव्हाण, शरद जाधव, रमेश कट्टीमनी, दीपक कुरळपकर, सचिन शिंदे ,बाबाजी धोत्रे, अशोक कुसाळकर, शेखर गाडीवडार, दीपेश पिटेकर, श्रीधर शिंदे , सुरेश पवार हे कवी सहभागी होणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश विटकर,संजू पवार,पुंडलिक धनवट,किसन पवार, अरविंद तेरदाळ, संदीप शिंदे , अशोक देवकर, संजू पवार, दिलीप नलवडे, महादेव मंजुळकर, सुनील पवार, अशोक इटकर हे राहणार असून या सत्राचे सूत्रसंचालन प्रकाश वाघमारे, माधुरी डोंगरे, सविता चौगुले,शरद धोत्रे हे करणार असून सुवर्णा मोरे या समारोप करतील.
पाचव्या सत्रात दुपारी तीन वाजता ज्येष्ठ साहित्यिक रामचंद्र मिरेकर यांच्या अध्यक्षतेखाली समारोप व आभार प्रदर्शन होणार आहे. यावेळी प्रमुख वक्ते प्रा.डॉ. अशोक बंडगर ,संगिता पवार आपले विचार मांडतील . यावेळी मंचकावर प्रमुख पाहुणे म्हणून रमेश जेठे, जगन्नाथ जाधव , श्रीमंत लष्कर, अश्विनी नलावडे ,रतन जाधव, संजय देवकर , दशरथ जाधव, षण्मुखानंद दाते, नागेश पवार, रामचंद्र मंजुळे हे उपस्थित राहणार आहेत. या सत्राचे सूत्रसंचालन माधुरी डोंगरे व अशोक कुसाळकर हे करतील तर शांताराम मनवरे हे या सत्राचे आभार मानतील.
सदर संमेलनात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा विविध पुरस्काराने सत्कार करण्यात येणार आहे.
यांचा होणार सन्मान..!
*कै .रामचंद्र नलावडे- साहित्यरत्न पुरस्कार :
डॉ.विजयालक्ष्मी देवगोजी - रत्नागिरी
डॉ.विक्रम कुलकर्णी - पुणे
सुरेश पाटोळे - पुणे
सुधाकर लाड - पनवेल
डॉ.व्ही.नारायणप्पा - दिल्ली युनिव्हर्सिटी
*रायगड किल्ला अभियंता हिरोजी इटळकर – समाजरत्न पुरस्कार
रवी शिंदे - सोलापूर
विजय धोत्रे - मुंबई
रघुनाथ निंबाळकर - मुंबई
सतीश शिंदे - पुणे
प्रा. डॉ.अशोक बंडगर- संभाजीनगर
*क्रांतिवीर वड्डे ओबन्ना समाज गौरव पुरस्कार.:
समाधान कापसे - नाशिक
अशोक शिंदे - अहमदनगर
सदाशिव जाधव- पुणे
निलेश इटकर - बार्शी
मारुती गायकवाड - इंदापूर
सूर्यकांत पवार - मुंबई
लक्ष्मण चव्हाण - औसा
*शब्दवेधी- यल्लाण्णा वड्डार- कला क्रीडा पुरस्कार:
अशोक धोत्रे - मोहोळ
बाल नरसिंहडू वड्डे - आंध्रप्रदेश
अशोक बनकर - वसई लक्ष्मण जाधव- बीड प्रमोद गुंजाळ - अहमदनगर
*महिला क्रांतिवीर प्रीतीलता वड्डार- कन्यारत्न पुरस्कार
जयश्री देवकर- अहमदनगर
वर्षा शेलार -अहमदनगर
सुनिता जाधव- ऐरोली, नवी मुंबई
ह भ प वैष्णवी शिंदे- वाई
प्रिया पवार - कोल्हापूर
*शूरवीर हरबा वडार -विशेष गौरव पुरस्कार
हभप पोपट कुसमुडे- अहमदनगर
दक्ष धनवटे - बुलढाणा
विकास पिटेकर - नेवासा
सुदर्शन पिटेकर - नेवासा
हभप पिराजी मिरेवाड - नांदेड
हभप विवेक चव्हाण- यवतमाळ.
यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे. तरी वडार समाजातील जास्तीत जास्त नागरिकांनी या दुसरे अखिल भारतीय वडार बोली साहित्य संमेलनामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन सेक्रेटरी अशोक पवार, सहसेक्रेटरी रमेश जेठे, सहकार्याध्यक्ष हरीश बंडीवडार आदींनी केले आहे.