शौकतभाई शेख । श्रीरामपूर :-
न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज श्रीरामपूर येथे सुरू असलेल्या दिवाळी क्रीडा शिबिर मध्ये आज आयुर्वेद तज्ञ डॉ. अमित मकवाना यांनी शिबिरातील खेळाडूंना आहार आणि स्पोर्ट्स इन्ज्यूरी बद्दल मार्गदर्शन केले.यामध्ये वाढत्या मुलांचा आहार कसा समतोल असावा याबदल माहिती दिली.
केवळ कार्बोहायड्रेट, प्रोटीन,फॅट च्या व्यतिरिक्त आहारात अनेक घटक असतात की जे शरीरासाठी उपयुक्त असतात.त्यासाठी आयुर्वेद सिद्धांतानुसार गोड, तुरट, कडू, आंबट, तिखट, खारट ह्या सर्व चवींचे आहार पदार्थ आपल्या रोजच्या आहारात योग्य मात्रेत असणे आवश्यक आहे.तसेच जे आहारिय पदार्थ आपल्या भागामध्ये उगवतात जामध्ये महाराष्ट्रात ज्वारी, बाजरी, कोंकणात भात,दक्षिण भारतात इडली,डोसा, खोबरेल तेल व उत्तर भारतात मोहरी,गहू अश्या पदार्थांचा समावेश असावा.त्याच प्रमाणे आज बाराही महिने सर्व फळे व भाज्या मार्केट मध्ये उपलब्ध असतात,परंतु ज्या ऋतू मध्ये जे नैसर्गिक रित्या उगवते , ते पदार्थ त्याच ऋतू मध्ये खावे उदा. हिवाळ्यात आवळे, उन्हाळ्यात शरीरात पाणी पकडणारे टरबूज इ. शरीरासाठी उपयोगी असतात.
याच बरोबर आहार सेवनाचे नियम, जसे दोन आहार मध्ये किमान ३ ते ४ तासाचे अंतर असावे,आधीचे अन्न पचले नसतांना म्हणजे भूक नसताना खाऊ नये.केवळ जिभेला आवडणारे पदार्थ खाऊ नये, त्याची पोषण क्षमता बघून आहार ठरवावा.पाणी पिताना आयुर्वेदानुसार ते ही हळू हळू, उन्हातून/ बाहेरून/ खेळून आले असता,काही काळ थांबून,थोडे थोडे घोट घ्यावे,एकदम घाई घाईने घळा-घळा पिऊ नये.दूध हे शक्यतो सकाळी उपाशी पोटी, रसायण काळी घ्यावे, जेवणात किंवा आंबट, खारट, तिखट पदार्थांसोबत २ तासाच्या आत एकत्र होता कामा नये,त्याने दूध फाटते व शरीरास अपाय कारक घटक तयार होऊन अनेक रोग उत्पन्न करतात.नित्य,किमान हिवाळ्यात वातावरणात कोरडे पणा वाढला असतांना शरीरास अभ्यंग म्हणजे तेल लावून अंघोळ करावी.त्याने स्नायू मधील लवचिकता टिकून राहते व शरीरास बळकटी येते.
शरीरास इजा झाली असताना डोके व सांध्यांच्या ठिकाणी विशेष काळजी घ्यावी,तेथील हालचाल सुरळीत असेल तरच पुढील खेळ सुरू ठेवावा अन्यथा सूज,लालसर पणा, हालचाल बंद असतांना स्नायू किंवा हाडांना इजा असण्याची शक्यता असते, व त्यासाठी वैद्यकीय सल्ला घ्यावा. रोज सकाळी शारीरिक खेळ असो,किंवा शाळा असो, आधी पोट साफ झाले पाहिजे.त्यासाठी थोडे लवकर उठून शौचासाठी वेळ मिळाला तर बिना औषध ते साफ होऊ शकते,तसे होत नसेल तर जवळच्या आयुर्वेद तज्ञाचा सल्ला घ्यावा.ही सर्व माहिती श्रीरामपूर येथील "२२ आयुर्वेद तज्ञानी हर दिन हर घर आयुर्वेद" या संकल्पनेवर एक दिवाळी विशेषांक प्रकाशित केला आहे त्याचे प्रकाशन धनत्रयोदशी च्या दिवशी करण्यात आले आहे आणि वाचकांसाठी ते सर्व आयुर्वेद क्लिनिक व नटराज बुक स्टॉल,पांडे पेपर एजन्सी येथे सवलतीच्या दरात उपलब्ध केलेले आहेत.
यावेळी क्रीडा शिबिराचे आयोजनात नितीन गायधने, नितीन बलराज,गौरव डेंगळे तसेच बहुसंख्येने खेळाडू उपस्थित होते.