shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

उद्या सुरवड येथे कामधेनु सेवा परिवाराच्या वतीने अकाली विधवा झालेल्या सर्व भगिनी त्यांची मुले , सैनिकांच्या पत्नी आणि माता यांच्या भाऊबीज समारंभाचे आयोजन.

उद्या सुरवड येथे कामधेनु सेवा परिवाराच्या वतीने  अकाली विधवा झालेल्या सर्व भगिनी त्यांची मुले , सैनिकांच्या पत्नी आणि माता यांच्या भाऊबीज समारंभाचे आयोजन.    
       इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यात कामधेनू सेवा परिवाराच्या वतीने दिनांक २२ ऑक्टोबर २०२२ रोजी दिवाळीच्या पूर्वसंध्येला सर्वांचे बहुमोल सहकार्याने  अकाली विधवा झालेल्या सर्व भगिनी त्यांची मुले , सैनिकांच्या पत्नी आणि माता यांच्या भाऊबीज समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.                      कामधेनू सेवा परिवार आपली चौदावी भाऊबीज अतिशय उत्साहाने, आपुलकीने आणि प्रेमाने साजरी करत आहे. दीपावलीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच शनिवार दिनांक २२ ऑक्टोबर २०२२ या दिवशी, वेळ दुपारी १२ ते २ या वेळेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
       या कार्यक्रमाचे उद्घाटन अमर शहीद वीर जवान लक्ष्मणराव डोईफोडे यांच्या वीर पत्नी सुवर्णाताई लक्ष्मणराव डोईफोडे बोराटवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे यांच्या शुभहस्ते होणार आहे.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  हर्षवर्धन शहाजीराव पाटील  माजी संसदीय कार्यमंत्री महाराष्ट्र राज्य,तसेच  प्रा. नामदेव जाधव, 'शिवाजी द मॅनेजमेंट गुरु' या बेस्ट सेलर पुस्तकाचे लेखक आणि माँसाहेब जिजाऊ यांचे चौदावे वंशज आहेत.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून परमपूजनीय गुरुवर्य ह.भ.प.  लक्ष्मणमहाराज कोकाटे मठाधिपती श्री क्षेत्र कन्हेरी यांच्या उपस्थितीत  श्रीकृष्णा मंगल कार्यालय सुरवड येथे आयोजित केले आहे.
       या कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात बहुमोल कार्य केलेल्या व्यक्तीला कामधेनू सेवा परिवाराचा सेवा पुरस्कार सन्मान दिला जातो. तसेच उपस्थित सर्वांना  दिवाळीचे पंचपक्वान्नाचे नियोजन करण्यात आले आहे. 
        या  सर्व अकाली विधवा झालेल्या सर्व जाती धर्माच्या भगिनी आणि त्यांच्या मुली मुले तसेच सर्व सैनिकांच्या पत्नी आणि माता यांना काही दानशूर व्यक्तींच्या स्वखर्चाने भाऊबीजेनिमित्त बांगड्या भरण्याचे नियोजन केले आहे .अनाथ मुलांना आणि विधवांना कार्यक्रमास्थळी येण्यासाठी आणि कार्यक्रमातून घरी जाण्यासाठी मोफत बस सेवा दानशूर व्यक्तींच्या मार्फत उपलब्ध करून दिलेली आहे.महाराष्ट्रातील अनेक दात्यांनी कामधेनू सेवा परिवाराच्या, तसेच सर्व सदस्यांनी या शुद्ध आणि पवित्र कार्यासाठी भरभरून दान केलेले आहे.
       कोणी मुलांसाठी वह्या दिल्या, कोणी त्यांच्या कपड्यासाठी पैसे दिले, कोणी भगिनींसाठी साड्या दिल्या. त्यांच्या भावना आणि दान शुद्ध व पवित्र आहे असे सर्व दाते या कार्यक्रमात उपस्थित राहणार असल्याची माहिती कामधेनु परिवाराची डॉक्टर लक्ष्मण आसबे यांनी माहिती दिली.
close