shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एमसीए अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अमोल काळे विजयी... कट्टर ‌विरोधक एकत्र.

शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह...

मुंबई:-  महाराष्ट्रातील राजकारण कधी बदलेल सांगताच येत नाही.असेच काही घडले आहे.
राज्यातील कट्टर राजकिय विरोधक एकत्र आल्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक प्रचंड चर्चेत आली...शिंदे-फडणवीस, आशिष शेलार आणि शरद पवार यांनी संयुक्त पॅनल उभे केल्याने बलाढ्य पॅनल झाल्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. अखेर काल रात्री निवडणूकीचे निकाल आले
असून अध्यक्षपदी अमोल काळे यांची वर्णी लागलेली आहे. तर या निवडणुकीत संदीप पाटील यांचा पराभव झाला...

शरद पवारांनी आपल्या पध्दतीने   संदिप पाटीलांना सुरूवातीला पाठिंबा दिला होता मात्र आशिष
शेलार यांनी शरद पवार साहेबांची भेट घेतली  आणि भेटीनंतर खलबते घडली. यानंतर पवारांनी शेलारांच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. त्यानंतर अमोल काळेंचा विजय निश्चित मानला जात होता. त्याप्रमाणे काल पार पडलेल्या निवडणुकीत अमोल काळे यांना 183 मतं मिळाली.तर संदीप पाटलांना एकूण 158 मतं मिळाली.
यामुळे आश्चर्यकारक घटनेमुळे महाराष्ट्र सं केले जात आहे.
close