बावडा येथे संवाद सभा व ग्रामसुरक्षा दलातील जवानांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रमाचे आयोजन.
बावडा परिसरातील सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शेतकरी संघर्ष समिती अध्यक्ष पंडितराव पाटील यांनी केले अवाहन.
इंदापूर प्रतिनिधी: ग्रामपंचायत बावडा,पोलीस स्टेशन व शेतकरी संघर्ष समिती बावडा यांच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर पोलीस स्टेशन अंकित बावडा येथे शुक्रवारी दि.२१ ऑक्टोबर २०२२ रोजी सायं ५ वाजता शेतकरी,व्यापारी,व्यवसायिक, कृषि,महसूल,आरोग्य इ.क्षेत्रातील स्थानिक शासकीय अधिकारी यांच्याशी त्यांच्या विभागातील तातडीच्या सामूहिक प्रश्नावर कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने व सार्वजनिक हितासाठी विचारांची देवाण घेवाण व्हावी म्हणून संवाद सभेचे व ग्राम सुरक्षा दलातील जवानांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेस उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.तर
पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी ग्रामपंचायत बावडाचे सरपंच किरण पाटील, इंदापूर पोलीस स्टेशन अंकित बावडा चे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांच्या उपस्थितीत आरोग्य अधिकारी आपल्या परिसरातील डेंगू,चिकणगुनिया इ.आजारांवरील सध्याची स्थितीत काय उपाययोजना करता येतील याचा अहवाल देतील ,सातत्याने पडत असलेला पाऊस ,बदलते हवामान,पीक परिस्थिती इ.ची माहिती कृषी अधिकारी देतील. ई पीक नोंदीबाबतची माहिती महसूल अधिकारी देतील. या परिसरातील चोरी,दरोडे व अवैध धंद्याला आळा घालण्यासाठी कोणती प्रतिबंधात्मक उपाययोजना केली याची माहिती पोलीस अधिकारी देतील.
ग्राम सुरक्षा दलातील जवानांना विविध बक्षीसे व प्रशस्तिपत्रे देऊन प्रोत्साहित करणार असल्याची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाला परिसरातील शेतकरी,व्यापारी,ग्रामस्थ व संबंधित शासकीय अधिकार्यानी मोठ्या संख्येने हजर राहण्याचे आवाहन शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष पंडितराव पाटील यांनी केले.