प्रतिनिधी : प्रविण देशमुख
सुलतानपूर : १६ / पुस्तक वाचनाने माणसाच्या स्मृतित वाढ होते व माणुस प्रगती करु शकतो वाचन कराल तरच वाचाल असे उदगार हभप अशोक महाराज कचरे यांनी काढले.
स्व भाऊसाहेब देशमुख सार्वजनिक ग्रामीण वाचनालय सुलतानपूर ता. नेवासा येथे भारतरत्न डाॕ .ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राठोड सर होते. तर यावेळी सोपानराव देशमुख, घोरपडे सर, अनिल देशमुख आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कडूचंद कचरे, अमोल पाटेकर, अशोक वाघ, राऊसाहेब साळुंके आदी उपस्थित होते.