shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विष्णू माणिक दहिपले या रुग्णास मुख्यमंत्री सहायता निधीतून अर्थसहाय्य रुपये 1,00,000/- उपचारासाठी मदत

जगदीश का. काशिकर,
 कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

कल्याण: शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, कल्याण शहर कक्ष प्रमूख चंद्रसेन मच्छिंद्र सोनावळे यांच्या प्रयत्नातून रुग्ण विष्णू माणिक दहिपले, ठिकाण: चिखली तालुका, अहमदपूर, जिल्हा लातूर या रुग्णास मुख्यमंत्री सहायता निधीतून अर्थसहाय्य रुपये 1,00,000/- (एक लाख रुपये) उपचारासाठी मदत करण्यात आली.

महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, डॉ श्रीकांत शिंदे व मुख्यमंत्री सहाय्यता निधी चे कक्ष प्रमुख श्री मंगेश चिवटे तथा कक्ष प्रमूख महाराष्ट्र राज्य राम राऊत, रविंद्र ननावरे, मंत्रालय मुख्यमंत्री सहाय्यता निधी टीम व कक्ष प्रमूख कल्याण शहर - श्री चंद्रसेन मच्छिंद्र सोनावळे यांच्या माध्यमातून मदत करण्यात आली.
 
मदत मिळाल्यावर नातेवाईक व मुलगा दिनेश विष्णू दहीपले यांनी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, श्री मंगेश चिवटे तथा कक्ष प्रमूख महाराष्ट्र राज्य -  राम राऊत व कक्ष प्रमूख कल्याण शहर - चंद्रसेन मच्छिंद्र सोनावळे तसेच ईतरांचे आभार मानले.

मंगेश नरसिंह चिवटे, कक्ष प्रमुख - मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, मंत्रालय, मुंबई यांच्या सहकार्याने अशी मदत महाराष्टातील जनतेला विविध ठिकाणी गरजवंत रूग्णांना त्यांच्या रूग्ण सेवकांमार्फत होत आहे तरी जनतेने जनजागृतीसाठी पुढाकार घेऊन हीच माहिती गरीब आणि गरजु रुग्ण व त्यांच्या कूटुंबा पर्यत पोहचवणे गरजेचे आहे !!
close