शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
खास बातमी
महिला दिनानिमित्त शिर्डीलीनेस क्लबने वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कार्याची चूनुक दाखविणाऱ्या दहा कर्तृत्ववान महिलांचा सत्कार केला.
पत्नीच्या विचारांशी ठामपणे उभा राहणाऱ्या पती देवांचाही सत्कार करीत अनोखा उपक्रम राबविला .
दरम्यान महिला दिनाचे औचित्य साधून झाशीची राणी, शिवराज्याभिषेक सोहळा अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.या शिवराज्याभिषेक सोहळ्यातील सर्व पात्रे ही महिला कलाकारांनी सादर केली .हे कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते. लिनेस क्लब ऑफ शिर्डी साई च्या अध्यक्षा सौ माधुरी ताई शिंदे यांनी पाहुण्यांचे स्वागत करून महिलांना मार्गदर्शन केले.महिलांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की पती-पत्नी दोघांच्याही कर्तुत्वाला ,कलागुणांना वाव मिळण्यासाठी एकमेकांची साथ अतिशय महत्त्वाची असते .सासर आणि माहेर या दोन्ही कुळांचा उद्धार करते ,मातृत्वाची देणगी परमेश्वराने स्त्रीला बहाल केली आहे.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. शिवानी वारुळे यांच्या भरतनाट्यम ने झाली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान डिस्ट्रिक्ट चार्टर्ड प्रेसिडेंट रजनीताई गोंदकर यांनी भूषविले.चित्रा इंगळे दिग्दर्शित शिवराज्याभिषेक सोहळा व झाशीची राणी नृत्याने प्रेक्षकांची मने जिंकली.सत्कारमूर्ती सपना अजित पारख , शोभाताई एकनाथ गोंदकर , सुधा श्रीनिवासन ,अनुराधा जितेंद्र शेळके, अनिता विजय जगताप ,स्वाती किशोर बोरावके ,नीलम प्रबोध जोशी ,ज्योती शिवाजी गुंड ,अंजली रवींद्र गोंदकर, अनुष्का मनीष पटेल आधी महिलांचा पती राजांसमवेत सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना अनुराधा शेळके व डॉ. प्रबोध जोशी यांनी नवीन संकल्पनेचे उत्कृष्ट नियोजन व उत्तम टीमवर्कचे कौतुक केले.आदरणीय भास्कर गोंदकर सर व दत्ताभाऊ लुटे हे कार्यक्रमास उपस्थित होते. शिर्डी करांचे श्रद्धास्थान असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात हा कार्यक्रम पार पडला.सूत्रसंचालन वैशाली जाधव व डॉ. अर्चना जगताप तर आभार शोभाताई लवांडे यांनी मानले.

