अमरावती : दिनांक 24/9/23 रोजी आरोग्य सहाय्यक समूहाचे धर्मा वानखडे यांनी जिल्ह्यातील डीएचओ ऑफीस,टीएचओ ऑफिस,मलेरिया विभाग, फायलेरिया विभाग आणि तालुक्यातील प्रा.आ. केंद्र कार्यरत आरोग्य सहाय्यक यांचे प्रतिनिधींची प्राथमिक स्वरूपात संयुक्त सभा आयोजित केली होती. जिल्हा परिषद विश्रामगृह येथे ती मोठ्या उत्साहात पार पडली.
सभेमध्ये सर्वांनी आपल्यावर होत असलेल्या आर्थिक अन्यायाचा निषेध व्यक्त केला.जसे आरोग्य सेवक,आरोग्य सहाय्यक,सहाय्यिका ग्रेड वेतन तफावत, इन्सेन्टिव्ह पाच ते दहा हजार मिळणेबाबत,प्रवास भत्ता किमान पाच हजार मिळणेबाबत ,अतिदुर्गम भागात हार्डशिप भत्ता लागू करणेबाबत व तसेच आरोग्य सहाय्यक मेळावा घेणे, या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली व सर्वांनी आपले मत व्यक्त केले.
आणि सभेमध्ये पुढील येणाऱ्या बाबीवर रणनिती तयार करण्यात आली.आणि जिल्ह्यातील सर्वं आरोग्य सहाय्यकांची सभा ऑक्टोबर महिन्यात आठ तारखेला घेण्याचे ठरले.सभेला धर्मा वानखडे यांचेसह,एस व्ही श्रीराव,गजानन सुने,जयंत औतकर,बी बी माहोरे,राजू मेश्राम,अशोक सुरतने, विलास निरगुळे, सुनील दातीर, आनंद धुर्वे, अशोक शिरभाते, भिलावेकर,कैलास मोहोड, नितीन कळंबे, जी एस मनोहर,जी आर गुडधे,रितेश धवणे,आर टी खडसे, महादेव सोळंके, व्ही एम तिरळकर,के पी मदने उपस्थित होते.

