अहमदनगर:-
महाराष्ट्रामध्ये व देशामध्ये मोटार वाहनांमध्ये ओव्हरलोडींग माल भरून राजरोजपणे वाहतूक करत आहेत. या ओव्हरलोडींग वाहतुकीमुळे रस्ते पुरते खराब होत आहेत, रस्ते लवकर फुटत आहेत, 10 टायर 12 टायर 16 टायर त्यापेक्षा जास्त टायरचे ट्रक शासनाने पासिंग करताना ठरवून दिलेल्या मालापेक्षा किती तरी पट माल ट्रक मध्ये अधिकारी यांच्या आशिर्वादाने भरला जातो, यामध्ये हप्ता खोरी, वसूली खोरी मोठ्या प्रमाणात चालू आहे.संबंधित अधिकारी बिनधास्त पणे हप्ते घेतात., त्यामध्ये दलाल( एजंट)पण या देशाच्या संपत्तीचे अतोनात नुकसान करत आहेत.ही बाब देशासाठी खुप घातक व सर्वनाश करणारी बाब आहे. हे आता विसरून चालणार नाही.
आज करोडो खर्च करूनही सर्व रस्त्यांची निव्वळ चाळण होत आहे. नवीन रस्ते केल्यानंतर ओव्हर लोडिंग गाड्या गेल्यानंतर रोड पुन्हा काहीच महिन्यामध्ये पुर्ण खराब होतात. सिमेंट रोड काही प्रमाणात तग धरू शकतो, पण डांबरीकरण रस्ते खराब होऊन चाळण होते व शासनाचे म्हणजेच जनतेने कर रूपाने दिलेले पैसे पाण्यात जात आहेत. तरी अशा या भ्रष्टाचारी लोकांचा कायमचा बंदोबस्त करून, अशा देशाच्या संपत्तीचे नुकसान करणाऱ्या लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून जेलचा रस्ता दाखवलाच पाहिजे, म्हणजे अशा लोकांना या पध्दतीने धडा शिकवल्याशिवाय लोडींग चे भ्रष्टाचार कदापीही थांबणार नाही.
केंद्र सरकारने, राज्य सरकारने सीबीआय तसेच ई डी केंद्रिय सक्तवसुली संचालन व इतर केंद्रीय तपास यंत्रणा राज्याच्या तपास यंत्रणांकडून तपास करून अशा चोरांना जेलचा रस्ता दाखवून त्यांना भ्रष्ट मार्गाने जमा केलेली संपत्ती शासनाकडे तात्काळ जमा करावी. अशा पध्दतीने करत असलेल्या चोऱ्या बंद करण्यासाठी कडक कायदे त्वरित करावे.अशा आशयाचे निवेदन विलास कराळे पाटील यांनी पंतप्रधान मा.नरेद्रजी मोदी यांना पाठवले आहे.तसेच या निवेदनाच्या प्रती
१)ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे
२)केंद्रीय गृहमंत्री भारत सरकार,नवी दिल्ली
३)केंद्रीय अर्थमंत्री भारत सरकार,नवी दिल्ली
४)केंद्रीय रस्ते वाहतूक सडक परिवहन मंत्री,नवी दिल्ली
५)माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
६)उपमुख्यमंत्री तथागृहमंत्री महाराष्ट्र राज्य
७)जिल्हा पोलीस प्रमुख अहमदनगर
८)उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
यांना पाठवले आहेत.

