इंदापूर प्रतिनिधि: इंदापूर शहरातील विकास खिलारे यांची राष्ट्रवादी सामाजिक न्याय तालुका कार्याध्यक्षपदी
निवड केली असून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. सदर नियुक्तीपत्र दिल्यानंतर विकास खिलारे म्हणाले की, आपली पक्षनिष्ठा आणि कर्तव्य सोबत पक्षाची ताकद व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, संसदरत्न खा सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सामाजिक न्याय प्रदेशाध्यक्ष आमदार जयदेवराव गायकवाड, तसेच जिल्हाध्यक्ष सागर बाबा मिसाळ यांच्या आदेशानुसार पक्षाची ध्येयधोरणी विचारधारा केंद्रस्थानी ठेवून पक्षाच्या विस्तारार्थ आणि संघटन वाढवण्यासाठी वाटचाल करणार तसेच सक्षम कृतीतून जन सामान्याच्या मनामनात राष्ट्रवादी पक्षाची प्रतिमा उत्तरोत्तर अधिक उज्वल करणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या वेळी महिला तालुकाध्यक्ष छायाताई पडसळकर, अक्षय कोकाटे, प्रतीक्षा बालगुडे,अरबाज भाई शेख, संमदभाई सय्यद, अनिल ढावरे, श्रीकांत मखरे उपस्थित होते.