रुई गावचे आकाश कांबळे यांची भाजपा पुणे जिल्हा सरचिटणीस (महामंत्री )पदी निवड...
इंदापूर प्रतिनिधी:- येथील भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाचे सचिव, भाजपाचे धडाडीचे युवा नेते, सरपंच परिषद अध्यक्ष, विविध सामाजिक राजकीय कार्यक्रमात आग्रही राहणारे रुई (ता- इंदापूर)गावचे
युवा नेतृत्व उद्योजक आकाश विलासराव कांबळे यांची भाजपा पुणे जिल्हा ग्रामीण सरचिटणीस पदी नुकतीच एक मताने निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदन यांचा वर्ष होत असून सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
अधिक माहिती देताना कांबळे म्हणाले की, भारतीय जनता पार्टीने एका खेड्या गावातील तरुणाला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना देखील माझ्यातील धडपड ओळखून मला युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव पदाची जबाबदारी दिली. हि जबाबदारी पार पाडत असताना गेल्या २ टर्म मध्ये या पदाला साजेसे काम करण्याची संधी मला मिळाली. या कार्यकाळात कधीच पक्षाने दिलेल्या जबाबदारीतून बाहेर पडलो नाही. तदनंतर पक्षाने मला कोल्हापूर जिल्याच्या युवा मोर्चा प्राभारी पदाची जबाबदारी दिली. तेथे ही मी प्रवास करून पक्ष संघटन वाढीकरिता प्रयत्न केले. मा. मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री ना .देवेंद्र फडणवीस यांच्या मनातील असणारी संकल्पना म्हणजेच युवा वरियार्स याचा ही मी पश्चिम महाराष्ट्र संयोजक म्हणून काम करीत असताना समाधान होतेच. युवा वॉरियर्स यामध्ये युवकाचा मोठा मेळावा देखील बारामती या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये मला घेण्याचे भाग्य मिळाले. तसे पंढरपूर पोटनिवणुक, कोल्हापूर पोटनिवडणूक, गोवा विधानसभा या ठिकाणचा निवडणूक प्रक्रियेत माझा निवासी सक्रिय सहभाग होता. विविध आंदोलने, पक्षाचे विविध उपक्रम, मन की बात सारखे अनेक विषय यांसारखे कामे करत असताना पक्षसंघटनेत कधीच कोणत्याच कामात चालढकल केली नाही आणि त्याचच फलित म्हणून पक्षाने माझ्यावरती भारतीय जनता पार्टी पुणे ग्रामिणच्या सरचिटणीस (महामंत्री ) पदाची जबाबदारी संघटनेने माझ्यावरती सोपवली असल्याचेही त्यांनी पुढे बोलताना सांगून या नवीन जबाबदारी मध्ये तुसभरही कमी पडणार नाही असा विश्वास व्यक्त केला.
तसेच पुढे बोलताना सांगितले की, महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री चंद्रकांत पाटील, मा.मंत्री हर्षवर्धन पाटील व भाजपा जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांनी फादर बॉडी मध्ये एवढी मोठी जबाबदारी देत जो विश्वास माझ्या सारख्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीवर दाखवला. त्याला नक्कीच मी पुर्ण ताकदीने न्याय देण्याचा प्रयत्न करील व संपूर्ण जिल्ह्यात पक्षाचे काम जोमाने वाढवण्यात माझा मनापासून हातभार लावील...!! आत्ता पर्यंतच्या प्रवासात खूप हितचिंतक, मार्गदर्शक, मला भेटले. आणि त्यांच्याच आशीर्वादामुळे ही संधी मला मिळाली . तरी सर्व सहकाऱ्यांबद्दल कृज्ञता व्यक्त करतो. आपले सर्वांचे आशीर्वाद आणि प्रेम असेच कायम असुद्या अशी सदिच्छा व्यक्त करतो अशा शब्दात त्यांनी माहिती सांगितली.

