shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आमदार या नात्याने तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील - आमदार दत्तात्रय भरणे.

*आमदार या नात्याने तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील - आमदार दत्तात्रय भरणे.
 मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून  मिळाले तब्बल १९ कोटी ४५ लाख* ...आमदार दत्तात्रय भरणे.
 
इंदापूर प्रतिनिधि: माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून पुन्हा एकदा इंदापूरला घसघशीत निधी प्राप्त झाला असून 

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2  योजनेतून तालुक्यातील आठ रस्त्यांसाठी तब्बल 19 कोटी 45 लाख मंजूर झाले आहेत.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस तसेच खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नामुळे हा निधी मंजूर झाला आहे.मागील काही दिवसांपुर्वीच प्रधानमंत्री तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून आपण  कोट्यावधी रूपये आणले होते.त्यानंतर लगेचच तीन महिन्याच्या आतच अजून आठ रस्त्यांना मंजुरी मिळाल्याने   तालुक्यातील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहेत. अशी माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी माहिती दिली आहे.
इंदापूर तालुक्यातील एकूण आठ कामांकरिता 20 किलोमीटर ची लांबी मिळालेली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने बऱ्याच दिवसांपासून या रस्त्यांकरिता निधी मिळावा म्हणून आमदार दत्तात्रय भरणे प्रयत्नशील असल्याचे सांगितले. तसेच1)रामा 120 जांब ते छत्रपती हायस्कूल मानकरवाडी रस्ता लांबी 3.200 किमी
रक्कम 3 कोटी 22 लाख 
२.हिरेमठवस्ती नगरे मळा प्रजिमा-194 ते उंडेवस्ती बेलवाडी विद्यालय रस्ता लांबी 1.900 किमी 
रक्कम 1कोटी 72 लाख
3) रामा 132 काझड ते बाबुराव पाटील नंदिवाले वस्ती ते वडाचा मळा रस्ता लांबी 3.600 किमी
 रक्कम 2 कोटी 68 लाख
4)रामा 124 जंक्शन ते रुपनवर वस्ती आठदारे रस्ता लांबी 1.900 किमी रक्कम 1 कोटी 80 लाख
5)रामा 65 ते कुताळवाडी ते भाग्यनगर रस्ता लांबी 1.600किमी
रक्कम 1कोटी 33 लाख
6)प्रजिमा 125 शिरसोडी खामगळ वस्ती रस्ता लांबी 2.200 किमी
रक्कम 2 कोटी 67 लाख
7)प्रजिमा 159 रामकुंड ते अभंगवस्ती ते झगडेवाडी रस्ता लांबी 2.800 किमी
रक्कम 3 कोटी 46 लाख
8)काटी ते जाधववस्ती रस्ता लांबी 2.800 किमी रक्कम 2 कोटी 53 लाख
या विषयी बोलताना आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले की,आमदार या नात्याने तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील असतो.आजपर्यंत आपण तालुक्यासाठी हजारो कोटी रूपये मंजूर करून आणले आहेत.विकासाची हिच गती चालू असून या रस्त्यांमुळे नागरिकांचे दळणवळण अजून सुलभ होणार असुन लवकरात लवकर सदरील कामांना प्रत्यक्षात सुरुवात होणार असल्याचे आमदार भरणे यांनी सांगितले आहे.
close