देशातील प्रत्येक वर्गाला उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने आयुष्मान भारत योजना सुरू केली - आमदार दत्तात्रय भरणे.
इंदापूर प्रतिनिधि: निमगाव केतकी येथील ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी आयुष्यमान भारत आरोग्य योजनेचा शुभारंभ माजी राज्यमंत्री तथा इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आला.देशातील प्रत्येक वर्गाला उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजेच आयुष्मान भारत योजना सुरू केली आहे.
सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. दवाखान्याची वेळ कधीही सांगून येत नाही. त्यामुळे या योजनेचा आपल्याला लाभ कसा मिळेल या योजनेचा उपयोग तालुक्यातील गोरगरीब जनतेला कसा होईल याकडे माझे पूर्ण लक्ष असते त्यामुळे गावातील तसेच तालुक्यातील लोकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन प्रत्येकाने आयुष्यमान भारत आरोग्य कार्ड काढून घ्यावे असे आव्हान आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले. त्याचबरोबर ज्या आशासेविका जास्तीत जास्त कार्ड काढून देतील त्यांच्यासाठी योग्य बक्षिसांची ही घोषणा त्यांनी केली.
निमगाव केतकी येथील नागरिकांनी आरोग्याच्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी आयुष्यमान भारत हेल्थ आयडी कार्ड काढून घ्यावे असे आव्हान इंदापूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुरेखा पोळ यांनी केले त्याचबरोबर या योजनेची सर्व माहिती उपस्थितांना दिली. हे कार्ड ३० डिसेंबर पर्यंत मिळणार असून नागरिकांनी आपला शंभर टक्के सहभाग नोंदवून हे कार्ड काढून घ्यावे.
यावेळी माजी जि.प सदस्य प्रताप पाटील, सरपंच प्रवीण डोंगरे, उपसरपंच मधुकर भोसले, तंटामुक्ती अध्यक्ष अतुल मिसाळ, ग्रामपंचायत सदस्य तात्यासाहेब वडापुरे, दादाराम शेंडे, अजित मिसाळ, संतोष जगताप, बाबासाहेब भोंग, सुरेश बारवकर, अमोल राऊत डॉ.प्रणाली बडगुजर डॉ.कैलास व्यवहारे त्याचप्रमाणे ग्रामीण रुग्णालयातील परिचारिका, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-------------------------------++++++
चौकट:
•••• आयुष्यमान भारत योजनेद्वारे कोट्यवधी अल्प उत्पन्न आणि मध्यमवर्गीय लोकांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे गावातील प्रत्येक नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी हे आभा कार्ड काढून घ्यावे.
डॉ. मिलिंद खाडे
वैद्यकीय अधिकारी निमगाव केतकी.
फोटो
आयुष्यमान भारत योजनेचा शुभारंभ करताना इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे त्याचप्रमाणे वैद्यकीय अधिकारी

