शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केली होती ते जिवंत असताना त्याची जबाबदारी उद्धव ठाकरे यांवर दिली होती - खासदार सुप्रिया सुळे
इंदापूर प्रतिनिधि: ही शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केली होती ते जिवंत असताना त्याची जबाबदारी उद्धव ठाकरे यांवर दिली होती.आमदार अपात्रताप्रकरणी सोमवारी विधान भवनात सुनावनी पार पडली. यावरून बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदापूर मध्ये प्रतिक्रिया दिली आहे.
स्पीकरच्या ऑफिसवर सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले आहेत. सुप्रीम कोर्टाने सांगितल्यावर तरी काहीतरी निर्णय होईल अशी आमची अपेक्षा होती. जी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केली होती ते जिवंत असताना त्याची जबाबदारी उद्धव ठाकरे यांवर दिली होती. ही पार्श्वभूमी असताना त्यांच्याकडून त्यांचा पक्ष त्यांचं चिन्ह काढून घेण्याचं पाप शिंदे गटाने केले आहे. हे दुर्दैव असून ते महाराष्ट्राच्या राजकारणाला न शोभणारा आहे.असा घनाघात सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केला.
सोमवारी 25 सप्टेंबर रोजी खासदार सुप्रिया सुळे या इंदापूर शहराच्या दौऱ्यावर होत्या. जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने यांच्या निवासस्थानी युवा कार्यकर्ता संवाद बैठकीच्या आयोजन करण्यात आले होते यादरम्यान त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
सुळे पुढे म्हणाल्या,
गोपीनाथ मुंडे हयात नाहीत म्हणून त्यांच्या लेकीशी तुम्ही कसेही वागाल ? हा अन्याय आहे. कोणतही राजकारण न करता या राज्यातील आणि देशातील कुठल्याही लेकीवर अन्याय होत असेल तर मी तिच्या बाजूने खंबीरपणे उभी राहिल.पंकजा मुंडे यांचे वडिल गोपीनाथ मुंडे यांनी हयात असताना जेवढं भारतीय जनता पक्षाचे केले तेवढे करणारे महाराष्ट्रात नेते कमी असतील.सत्तेत नसताना पक्ष सत्तेत असण्यासाठी केवढे कष्ट केले आज त्यांची मुलगी लढतेय. भारतीय जनता पक्षात आहे त्या मुलीवर अन्याय करण्याचं पाप भारतीय जनता पक्ष करतोय याचा मी जाहीर निषेध करते.
भाजपाच्या एका दिल्लीतील खासदाराचे घर जीएसटी आणि टॅक्स प्रॉब्लेम मध्ये आले होते. मात्र भारतीय जनता पक्ष म्हणा किंवा अदृश्य हाताने त्यांच्या घराचा लिलाव कसा थांबवला असा सवाल उपस्थित करीत एकीकडे बेटी पढाव आणि बेटी बचाव म्हणणारी ही लोक मग पंकजा मुंडे भारतीय जनता पार्टीची लेख नाही का ? असा प्रति सवाल ही सुप्रिया सुळे यांनी भाजपाला केला आहे.
भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्यावर केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने कारवाई करत १९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली .या कारवाईनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली.
यावेळी सोनाई उद्योग समूहाचे अध्यक्ष दशरथ माने, माजी सभापती प्रवीण माने,अमोल भिसे,किसन जावळे सागर मिसाळ,विठ्ठल ननवरे, छाया पडसळकर, भारत मोरे,किशोर माने यांच्यासह युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
दरम्यान खासदार सुळे यांनी भर पावसात भिजत इंदापूर शहराचे ग्रामदैवत इंद्रेश्वर मंदिरात तसेच अनेक सार्वजनिक गणेश उत्सवात भेटी देऊन गणरायाच्या आरती केल्या.
.