shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर येथे ज्येष्ठ नागरिक संघामध्ये ज्येष्ठांची मोफत आरोग्य तपासणी

इंदापूर येथे ज्येष्ठ नागरिक संघामध्ये ज्येष्ठांची मोफत आरोग्य तपासणी 
इंदापूर प्रतिनिधि: शनिवार दिनांक ३० सप्टेंबर२०२३ रोजी ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूर येथे दुपारी ४ वाजता ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बाबासाहेब घाडगे, माजी अध्यक्ष नंदकुमार गुजर सर्व संचालक मंडळ ,सर्व सभासद, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ७३ ज्येष्ठांना  ओळखपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. 
सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई आतार, ज्येष्ठ नागरिक संघाचे संचालक लेखक महादेव चव्हाण सर,
ज्येष्ठ नागरिक संघाचे संचालक अशोक गानबोटे,   ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवस या महिन्याचे वाढदिवस साजरे केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबासाहेब घाडगे यांनी डॉक्टर सुहास शेळके यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला .कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबासाहेब घाडगे यांनी ही संकल्पना पुढे आणली आणि ज्येष्ठांसाठी सहल काढावी म्हणून त्यांनी हैदराबाद, राम जन्मभूमी, येथे सहलीचे नियोजन केले. ज्येष्ठ नागरिक संघामध्ये जर महिन्याला ज्येष्ठांसाठी आरोग्य तपासणी केली जाते. या महिन्यातील डॉक्टर सुहास शेळके यांनी १०२ ज्येष्ठांची कान, नाक, घसा, यांची तपासणी मोफत केली. ज्येष्ठांना आनेक व्याधी असतात त्यामध्ये विषेशताहा कान, नाक,घसा,या व्यधीवर योग्य मार्गदर्शन केले.त्या नंतर सर्वांची आरोग्य तपासणी केली. या कार्यक्रमा वेळी डॉक्टरांचा स्टाफ ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी त्यामध्ये भानुदास पवार, जाधव मॅडम पांडुरंग जगताप, भारत बोराटे, रघुनाथ खरवडे ,राजेंद्र चव्हाण, कार्यक्रमाच्या शेवटी सुभाष महाजन यांनी सर्वांचे आभार मानले.
close