shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

यशस्वी खेळाडू बनण्यासाठी मेहनत,अभ्यास, शिस्त व सहनशक्तीची गरज- प्रा अर्चनाताई आडसकर !!



 शारदा इंग्लिश स्कूल केज च्या जिल्हास्तर व विभाग स्तरावर निवड झालेल्या  खेळाडूंच्या सत्कार प्रसंगी व्यक्त केले मत 

 

 प्रकाश मुंडे/ बीड जिल्हा प्रतिनिधी  :- 

  

शारदा इंग्लिश स्कूल केज ही केज तालुक्यातील सीबीएसई माध्यमाची एकमेव अधिकृत मान्यता प्राप्त शाळा आहे . या शाळेने अल्पावधीतच शिक्षण क्षेत्र असो, क्रीडाक्षेत्र असो किंवा इतर कोणतेही क्षेत्र असो प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेली आहे. शैक्षणिक क्षेत्रात तर अटकेपार झेंडा रोवला असून चालू वर्षात इयत्ता दहावी पर्यंत शाळेत शिकलेल्या दहा मुलांची एमबीबीएस या अतिउच्च अभ्यासक्रमासाठी झालेली आहे. तसेच प्रसिद्ध अशा अभियांत्रिकी महाविद्यालय असो किंवा इतर विविध अभ्यासक्रम असो शारदा इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक ठिकाणी आपली छाप  सोडलेली आपल्याला पहावयास मिळते किंवा एक वेगळा ठसा उमटवलेला दिसून येतो.

 आज शाळेत शासनाच्या क्रीडा विभागातर्फे घेण्यात आलेल्या विविध क्रीडा प्रकारात शाळेच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. तालुकास्तरावर पहिले  येऊन जिल्हास्तरावर निवड झालेल्या तसेच विभाग स्तरावर निवड झालेल्या  शारदा इंग्लिश स्कूल केज  च्या सर्व विद्यार्थ्यांचा एकत्रित सत्कार संस्थेच्या संचालिका तथा शाळेच्या मार्गदर्शिका प्रा अर्चनाताई आडसकर यांच्या हस्ते करण्यात आला. 

 यावेळी बोलताना त्यांनी खेळाडू बनण्यासाठी केवळ शारीरिक क्षमता असून चालणार नाही तर  मेहनतीत सातत्य,कठोर अभ्यास, जीवनात शिस्त व सहनशीलता या गुणांची आवश्यकता असल्याचे सांगितले.याचबरोबर प्रत्येकानी आपल्या आवडत्या एकाच खेळावर लक्ष केंद्रित करावे. विविध  खेळावर किंवा क्रीडा प्रकारावर लक्ष दिले तर कोणत्याही क्रीडा प्रकारात यश मिळणार नाही हेही खेळाडूंना पटवून सांगितले.

  यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये विभाग स्तरावर निवड झालेल्या शूटिंग या क्रीडा प्रकारात जागृती तिवारी प्रथम आली असून शाळेची दुसरी विद्यार्थिनी अनुष्का  उजगरे ही  द्वितीय आलेली आहे तसेच शैलेश गरडे, भूषण टोणगे, अथर्व पिलाजी, पवन डोईफोडे, कृष्णा खामकर, स्वराली वडगावकर, वैष्णवी बडे,पियुष देशमुख, आराध्या राऊत,जानवी वीर, इंदिरा हौसलमल इत्यादी  विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर विविध क्रीडा प्रकारात निवड झालेली आहे. तसेच कराटे विभागात वैष्णवी शिरसाट, चैतन्य चाळक, विराट नेमके, वरद पाटील, आदेश फडतरे, सात्विक पिलाजी, प्रताप वाघमारे, अमित साठे, श्रेयस पिराजी,वीरा पाटील, यांची निवड झालेली आहे या सर्वांचा सत्कार अर्चनाताई आडसकर यांच्या हस्ते करण्यात आला.




यावेळी प्राचार्य मिश्रा एस एम यांनी शाळेच्या प्रगतीचा अहवाल समोर ठेवताना या यशाचे श्रेय शाळेतील क्रीडा  विभागाचे सर्व क्रीडा शिक्षक श्रीमती वर्षा दिक्कत मॅडम, सोळंके सर,  संग्राम मोहिते सर,श्री ठोंबरे सर यांना दिले व आगामी काळात हे विद्यार्थी राज्यस्तर पर्यंत पोहोचतील अशी खात्री दिली.

 कार्यक्रमाचा समारोप  करताना उपप्राचार्य सुरज सनी यांनी  विद्यार्थ्यांना शिस्तीचे महत्व पटवून  दिले व उपस्थित सर्वांचे सर्वांचे आभार मानले.

close