shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अनेक वर्षांची परंपरा असलेला केज येथील बालाजी मंदिर देवस्थानचा शारदीय नवरात्र महोत्सव होणार सुरू..!

प्रकाश मुंडे/ बीड जिल्हा प्रतिनिधी:-

शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते. शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की हे शरद ऋतूच्या प्रारंभी येते. भारतामध्ये सर्वत्र ह्या नवरात्रामध्ये प्रत्येकाच्या कुलाचाराप्रमाणे कमी-अधिक स्वरूपात पूजा-कृत्य घडते. दुर्गोत्सव हा वर्षातून शरद ऋतू व वसंत ऋतूतही साजरा करण्याची प्रथा असल्याचे काही ग्रंथांतून दिसून येते. दुर्गा देवतेचे माहात्म्य भविष्य पुराणात कथन केलेले आढळते.


आश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून , नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेची नऊ दिवस मनोभावे पूजा करणे, म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव.

नवरात्री पूजा साहित्य
हा सण नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे. पावसाळा बहुतेक संपलेला असतो, शेतांतील पिके तयार होत आलेली असतात, काही तयार झालेली असतात. अशा नैसर्गिक वातावरणात नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते. देव्हाऱ्यात अखंड नंदादीप, दररोज झेंडूच्या फुलांची माळ, देवीपुढे सप्तशतीचा पाठ अशा प्रकारे शारदीय नवरात्री व्रत केले जाते.

केजचे बालाजीचे नवरात्री उत्सव बारा दिवस असते

अनेक वर्षांची परंपरा असलेला केज येथील बालाजी मंदिर देवस्थानचा शारदीय नवरात्र महोत्सव 15 अक्टओंबर रविवारी सुरु होणार असून बारा दिवस चालणाऱ्या या महोत्सवात दररोज सकाळी दहा वाजता विष्णुसहस्रनाम स्तोत्र पठण  दुपारी अन्नदान  महाप्रसाद संध्याकाळी सहा हरिपाठ व रात्र आठ वाजता महाआरती संध्याकाळी कीर्तन सेवा दररोज नऊ ते अकरा वाजेपर्यंत असा दररोजचा नित्यक्रम.
दि.15 रोजी ह भ प महंत  राधाबाई ( आईसाहेब ) यांचे कीर्तन होणार आहे तर 16 व 17 तारखेला हे भ पण श्री संजय जोशी वझरकर, दि 18 ला हे भ प श्री विनायक महाराज अष्टेकर ( चित्तेपिंपळगाव )  दि 19 रोजी ह भ पण श्री रामदास महाराज आचार्य ( जालना ), दि 20 रोजी ह भ पण श्री माणिक महाराज मआंगउळकर ( जिंतुर ) दि 21 व 22 रोजी ह भ पण श्री दिलीप वसंत साठे महाराज (छ.संभाजी नगर) दि.23 हे भ प श्री समर्थ भक्त श्री गणेशबुवा  रामदासी ( छ.संभाजी नगर) दि 24 रोजी श्री जयंत सुधाकरराव केजकर संगीत रजनी दि 25 रोजी ह भ पण चिं. लक्ष्मीप्रसाद शंकरराव कुलकर्णी ( पटवारी ) ( बाल किर्तन रत्न पुरस्कार प्राप्त झी टॉकीज झी युवा झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध कीर्तनकार ) हार्मोनियम साथ श्री सुधीरराव देशमुख व तबला साथ श्री देविदासराव सुसंगे दिनांक 26 रोजी रोजी भव्य पालखी मिरवणूक सोहळा  भव्य  पालखीने महोत्सवाची सांगता होईल तरी भाविक भक्तांनी या महोत्सवासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कथा व कीर्तनांचा लाभ घ्यावा असे आवाहन बालाजी मंदिर विश्वस्त मंडळ पुजारी मंडळाच्या वतीने आव्हान करण्यात आले आहे.
close