shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आगामी लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष लोकसभेत खाते उघडणार - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले


रिपब्लिकन पक्षाचा 67 वा वर्धापन दिन हैद्राबाद मध्ये साजरा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या सल्लागार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई दि.4 - महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्षाचा 67 वा वर्धापन दिन आज हैद्राबाद मधील नामपल्ली एक्सझीबिशन मैदानात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आल्याची माहिती रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना.रामदास आठवले यांनी दिली. 

 रिपब्लिकन पक्ष संपणार म्हणणारे  संपले पण रिपब्लिकन पक्ष कधीही संपणार नाही.केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्ष देशभर वाढत आहे. नागालँड मध्ये रिपाइं चे 2 आमदार निवडून आले. आता देशात विविध राज्याच्या विधानसभेत रिपाइंचे खाते उघडले जाईल तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे खाते उघडले जाईल.  2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत रिपाइं चा एक ही खासदार  लोकसभेत निवडून गेलेला नाही.मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकीत रिपाइंचे किमान 2 खासदार लोकसभेत निवडून जातील.   महाराष्ट्र ईशान्य भारत आणि संपूर्ण  देशभरातून रिपाइं चे खासदार निवडून आणण्याचा कार्यकर्त्यांनी आज  निर्धार केला असून देशाच्या लोकसभेत रिपब्लिकन पक्षाचे खासदार नक्की निवडून येतील.  डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन चा वारसा आम्ही चालवत असल्याचा आम्हाला अभिमान आहे असे मत व्यक्त करून रिपाइं च्या 67 व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा  ना.रामदास आठवले यांनी दिल्या.

रिपाइं च्या या वर्धापन मेळाव्याचे आयोजन रिपाइं चे तेलंगणा राज्य अध्यक्ष रवी पसूला;परम शिवा नागेश्वरराव गौड; कोमपल्ली प्रभूदास;गोरख सिंग आदींनी केले.यावेळी रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर; एम वेंकट स्वामी; रिपाइं चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजा सरवदे:प्रकाश लोंढे; सिद्धार्थ कासारे; विनोद निकाळजे;  सुरेश बारशिंग; दयाळ बहादूर; उत्तम कांबळे; सुनील साळवे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
close