इंदापूर: पळसदेव (ता. इंदापूर): येथील एल.जी बनसुडे विद्यालयामध्ये २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाचे वार्षिक स्नेहसंमेलन अत्यंत उत्साहात आणि दिमाखात साजरे झाले. ' अँन आयकॉनिक इंडियन लिजेंड' या संकल्पनेवर आधारित असलेल्या या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे डॉ. सोमनाथ बोराटे ( इंडियन पॅरामेडिकल असोसिएशन (IPA), नवी दिल्ली महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष) यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष हनुमंत बनसुडे, कार्याध्यक्षा नंदा बनसुडे, सरपंच कोमलताई बनसुडे ,उपसरपंच कविता शिंदे, जयश्री शेलार ,इंद्रायणी मोरे, सचिव नितीन बनसुडे, विश्वस्त अंकुश बनसुडे, अर्चनाताई बनसुडे,विक्रमसिंह बोराटे, बाबा(आप्पा)बनसुडे ,अंजना बनसुडे, विठ्ठल बनसुडे ,उत्तमरावसाहेब बनसुडे , अजित शिंदे, कीर्ती काळे ,कल्पना फुले, मुख्याध्यापक राहुल वायसे, उपमुख्याध्यापक सुवर्णा वाघमोडे व पंचक्रोशीतील पालक व शिक्षक वृंद उपस्थित होते. प्राचार्या वंदना बनसुडे यांनी शाळेचा वार्षिक प्रगती अहवाल सादर केला, ज्यामध्ये शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या यशाचा आढावा घेण्यात आला.
स्नेहसंमेलनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस कलाकृती सादर केल्या. लहान गटातील मुलांनी सादर केलेले ' नृत्य' विशेष आकर्षणाचे केंद्र ठरले. तर मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी 'नारीशक्ती' आणि 'ऑपरेशन सिंदूर' यांसारख्या विषयावरील नृत्य सादर करून प्रेक्षकांना अंतर्मुख केले. गवळण व आदिवासी गीत यांसारख्या गीतांच्या सादरीकरणाने कार्यक्रमात रंगत भरली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती मारकड यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रकाश दरदरे यांनी मानले. पसायदानाने या सोहळ्याची सांगता झाली.

