आधुनिक तंत्रज्ञान,माती आरोग्य, ऍग्रो टुरिझमवर तज्ज्ञांचे मार्ग दर्शन;२५०विद्यार्थी व ५० शेतकऱ्यांचा सहभाग.
एरंडोल | प्रतिनिधी —
येथील यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाच्या दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शेतकऱ्यांसाठी विविध शासकीय योजनांवरील एकदिवसीय मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात पार पडली.
ही कार्यशाळा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत आजीवन अध्ययन व विस्तार विभाग तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) व राष्ट्रीय छात्रसेना (NCC) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा. अमित पाटील, उद्घाटक म्हणून प्रांताधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी मा. मनीषकुमार आत्माराम गायकवाड उपस्थित होते.प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. अनिल जे. पाटील, आदर्श शेतकरी भाऊसो शालिकग्राम गायकवाड, श्री. समाधान पाटील (कृषी भूषण), मा. प्रवीण पाटील, प्रा. डॉ. संदीप नेरकर यांची उपस्थिती लाभली.
कार्यशाळेत कृषी पर्यटन, माती आरोग्य व माती परीक्षण, शासनाच्या विविध कृषी योजना व शेतकऱ्यांसाठी सवलती या विषयांवर प्रोजेक्टरच्या माध्यमातून तज्ज्ञांनी सखोल मार्गदर्शन केले.मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. शैलेशकुमार वाघ, मयुरी अनुप देशमुख, मंडल कृषी अधिकारी ईश्वर पवार, उप कृषी अधिकारी किशोर साळुंखे यांनी विविध सत्रांत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात २५० पेक्षा अधिक विद्यार्थी व ५० शेतकरी सहभागी झाले होते. शेतकरी सहायता उपक्रमांतर्गत तालुक्यातील तरुण शेतकरी व शेतकरी पुत्रांचा सहभाग उल्लेखनीय ठरला.








