शिर्डी प्रतिनिधी :
श्रीकृष्ण नगर (एअरपोर्ट रोड) येथील रहिवासी व निकम परिवारातील ज्येष्ठ मार्गदर्शक कै. सौ. इंदुबाई पोपटराव निकम यांचे प्रथम पुण्यस्मरण बुधवार, दि. २१ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आले आहे. या निमित्ताने समस्त निकम परिवाराच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवारी सकाळी १० वाजता पुण्यस्मरणाच्या विधीला सुरुवात होईल. त्यानंतर सकाळी ११ वाजता प्रसिद्ध प्रवचनकार ह.भ.प. जगन्नाथ चंद्रभान चौधरी (पाटील) यांचे सुश्राव्य प्रवचन होणार आहे. हा कार्यक्रम एअरपोर्ट रोड, श्रीकृष्ण नगर, शिर्डी येथील निकम यांच्या निवासस्थानी पार पडणार आहे.
कै. इंदुबाई निकम या अत्यंत सात्विक आणि धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती श्री. पोपटराव महादू निकम, मुले श्री. दत्तात्रय निकम व श्री. बाबासाहेब निकम, मुलगी सौ. मंगल बाळू पवार, सुना, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.
आईच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आप्तेष्ट, मित्र परिवार आणि ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. पोपटराव निकम, श्री. दत्तात्रय निकम, श्री. बाबासाहेब निकम व समस्त निकम परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

