अहमदनगर जि.मा.का.वृत्तसेवा:
शासनाने १ ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण राज्यात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दि. १ ऑक्टोबर रोजी कै. भाऊसाहेब फिरोदिया वृद्धाश्रम संस्था, वसंत टेकडी, अहमदनगर येथे सकाळी ९.०० वाजता जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिक संघ तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या विविध संस्थांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्वजनिक पदयात्रा, प्रभात फेऱ्या, सभा, विशेष कार्य केलेल्या ज्येष्ठांचा व ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या बिगर सहकारी संस्थांचा सत्कार, गौरव, आरोग्य शिबीर, चर्चासत्र, परिसंवाद आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदे व योजना विषयक बाबींचा माहिती,वृध्दांचे हक्क, ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा, ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन इत्यादीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अधिकाधिक संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावे असेही प्रसिद्धी पत्रकारद्वारे कळविण्यात आले आहे.
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111