अकोले प्रतिनिधी:
जिल्हा परिषद प्राथमिक ऊर्दु शाळा अकोले ता.अकोले येथे दप्तर मुक्त उपक्रम अंतर्गत अकोले एस.टी. महामंडळ आगार येथे भेट देण्यात आली. आगार व्यवस्थापक श्री.गंभीर यांनी एस.टी. महामंडळाच्या विविध जन कल्याणकारी योजनांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. महिला सन्मान योजना, दिव्यांग सवलत, अहिल्याबाई होळकर योजना इ. ची माहिती दिली. या वेळी अन्सारी अबुजर दिलशाद या विद्यार्थ्यांने आगार व्यवस्थापक यांची मुलाखत घेतली. या प्रसंगी मुख्याध्यापिका श्रीमती समीना बाजी, तरन्नुम बाजी, इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतचे विद्यार्थी उपस्थित होते. तसेच अकोली एस.टी. आगार मधील कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मुलाखती चे आगार प्रमुख व कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111