नवभारत साक्षरता गीत
असाक्षरांना शोधूनी साक्षर करूया
नवभारताचे स्वप्न साकार करूया ॥ धृ ॥
अवतीभवती दिसे तुम्हा लोक हो भारी
परी शिक्षणाचा गंध नसे त्यांच्या कपाळी
अआ इईचे धडे , चला त्यांना शिकवू या ॥
शिक्षणाचे बीज लावियेले हो दारी
त्या साऊचे उपकार अमुच्या शिरी
बसा घेऊन, त्यांचे थोडे पांग फेडू या ॥
जिथे कुठे असाक्षरांची भेट घडेल
साक्षर करण्या तिथे मुचे पाऊले वळेल
असे स्वयंसेवक , तयार करूया ॥
जाणूनी घेऊ अडचणी त्या व्यथा मनाची
आदर ठेवूनी सांगड घालू अनुभवांची
घालवून भीती, शिकण्याची लाज सारूया ॥
पायाभूत शिक्षणाचा प्रसार करूया
संख्या ज्ञान देऊन अज्ञान घालवूया
मनी आत्मविश्वासाची , ज्योत लावूया ॥
साक्षरतेकडून समृद्धीकडे घेऊ भरारी
जन जन साक्षर ,घडे किमया न्यारी
या विकासाच्या , योजनेला सफल करूया ॥
कोठेकर योगिता संजय
शिवभूमी विद्यालय प्राथ. विभाग
निगडी पुणे - ४४
9890147859/9028505126