द्यायचे जे होते ते देवुन टाकले
दुख्ख जे होते ते पेवुन टाकले
शब्दांनी मी सांधत गेलो किती
पोटात जे होते ते लिहुन टाकले
आडवे आले जरी संकटे किती
वाटले जे खरे मी बोलुन टाकले
गातो गीत पाखरांच्या चोचीतले
बंदिस्त जखमांना खोलुन टाकले
शेर ऐकनारा यार दिलदार पाहीजे
शब्दांना शब्दांनी मी तोलुन टाकले
मनाला प्रेमाच्या सॅनिटायजरने धुतले
कुलुपे द्वेशाची मी खोलुन टाकले
मातीच्या गंधात गंधाळलो भेगाळलो
विमुक्त हे आकाश मी पेलुन टाकले
का उद्याची बात करु पाषान आयुष्या
होते क्षणभंगुर क्षण ते मी जगुन टाकले
जातांना जगातुन काही दिले पाहीजे
दौलत ही शब्दांची मी वाटुन टाकले
द्यायचे जे होते ते देवुन टाकले
दुख्ख जे होते ते पेवुन टाकले
आकाश सुपारे
9822510254

