गेले छळुन सारे माझ्याच काळजाला
नात्यात माझ्या हा गुंता फार झाला...
जखमा उरात माझ्या उचंबळुन आज आल्या
समोरुन मिठीत घेणार्यांनीच हा हसत वार केला...
पुसतो कोण नाही माझ्या ह्या वेदनेला
कामी माझ्या दुख्खाला एकही यार न आला...
माणसांनी ह्या मुखवट्यांवर मुखवटे पांघरलेली
मग मीही एक एक वेदनेचा शेर केला
घेवु कसे मी आता हे नाव कोणा कोणाचे
गुंफुन मी शब्दांना गळ्यातला हार केला...
आकाश सुपारे...

