एन .ई .एस हायस्कूल व जुनिअर कॉलेज मध्ये
महात्मा गांधी यांची व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती
मुकुंद भवन ट्रस्ट पुणे सकाळ व संस्थेच्या वतीने शालेय साहित्य प्रति १० विद्यार्थ्यांना देण्यात आले.
इंदापूर प्रतिनिधि: दि. २ ऑक्टोंबर २०२३ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती एन .ई .एस हायस्कूल व जुनिअर कॉलेज मध्ये प्रतिमेचे पूजन करून उत्साहात साजरी करण्यात आले. त्याप्रसंगी विद्यार्थी व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या जयंतीचे औचित्य साधून मुकुंद भवन ट्रस्ट पुणे सकाळ यांच्या कडुन गरजू १० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच संस्थेच्या वतीने १० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य यशवंत विविध कार्यकारी विकास सोसायटीचे विद्यमान चेअरमन नंदकुमार रणवरे, प्राचार्य चंद्रकांत रणवरे ,शाळा व्यवस्थापन चे अध्यक्ष चंद्रकांत काळे तसेच शाळा व्यवस्थापन चे सदस्य. पर्यवेक्षक मधुकर खरात सर . यांच्या शुभहस्ते देण्यात आले.
सकाळ फाउंडेशन कडून साहित्य मिळण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष संजय रणवरे व संस्थेचे सचिव धनंजय रणवरे यांनी मोलाचे सहकार्य केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मलगुंडे सर यांनी केले व आभार प्रदर्शन हणमंते सर यांनी केले.

