कौठळी शाळेत १ तारीख १ तास श्रमदान अभियान संपन्न..
इंदापूर प्रतिनिधि: दि.१ ऑक्टोबर रोजी स्वच्छता ही सेवा या अभियान अंतर्गत स्वच्छतेसाठी १ तास श्रमदान हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.आरती गायकवाड व अमित भोंग यांनी स्वच्छता व श्रमदान याविषयी उपस्थितांना माहिती सांगितली. स्वच्छता प्रतिज्ञा घेतली.शाळा व शालेय परिसराची स्वच्छता करण्यात आली.या अभियानामध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य,ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, महिला बचत गट,अंगणवाडी सेविका,मदतनीस,पालक,ग्रामस्थ, शिक्षक,विद्यार्थी फावडे,घमेले, खुरपे,झाडू घेऊन सहभागी झाले होते.सर्वांनी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला.मुख्याध्यापक भारत ननवरे सरांनी सर्वांचे आभार मानले.