shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बाबा महाराज खारतोडे यांची बारामती लोकसभा निवडणूक भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या प्रमुखपदी निवड.

*बाबा महाराज खारतोडे यांची बारामती लोकसभा निवडणूक भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या प्रमुखपदी निवड.
      इंदापूर प्रतिनिधि: भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मान्यतेने महाविजय 2024 साठी बारामती लोकसभा निवडणूक भाजपा अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली असल्याचे महाराष्ट्र राज्य भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी कार्यालयीन पत्राद्वारे जाहीर केले.
    बाबा महाराज खरतोडे यांनी १९८२ साली आळंदी येथे जाऊन वारकरी संप्रदायाचा अभ्यास पूर्ण केला. त्यांनी कीर्तन व प्रवचन या माध्यमातून समाजप्रबोधनाचा वारकरी संप्रदायाचा व हिंदू धर्माचा प्रचार व प्रसार मोठया प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये केला.१९८६-८७ पासून हिंदू युवा क्रांती या संघटनेच्या माध्यमातून समाजकार्यास त्यांनी सुरुवात केली. या संघटनेच्या माध्यामातून पुणे कलेक्टर कचेरीवरती कळस ता. इंदापूरमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी तळे व्हावे म्हणून सात दिवस आमरण उपोषण केले. १९९० मध्ये स्व. शंकररावजी पाटील खासदार बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांच्या समवेत मोठ्या प्रमाणावर कार्य केले.१९९५ मध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचार कार्यांमध्ये सक्रिय सहभाग.२००१ मध्ये समाज प्रबोधनातून व्यसनमुक्तीच्या केलेल्या कार्यामुळे महाराष्ट्र शासनाने दखल घेतली व महाराष्ट्र शासन व्यसनमुक्ती सेवा राज्यस्तरीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. 
२००३ ते २००८ मध्ये कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे ते संचालक होते.२००४ मध्ये श्री. विठ्ठल रुक्मिणी सेवाभावी संस्था या नावाने संस्था स्थापण केली. महाराष्ट्र राज्य भाजपा आध्यात्मिक समन्वय विकास आघाडी प्रदेश कार्यकारिणीच्या सदस्य व संघटकपदी ते कार्यरत आहेत.
     भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ,महाराष्ट्र राज्य भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले, माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली 2024 बारामती लोकसभा निवडणूकीत भाजपच्या विजयासाठी या भाजपा आध्यात्मिक आघाडीच्या माध्यमातून आपण कार्यशील राहणार आहे. 2024 ला बारामतीला भाजपचा खासदार विजय होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
close