shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

घर बचाओ संघर्ष समितीच्यावतीने खा.सदाशिव लोखंडे यांना निवेदन

उद्या दि.९ ऑक्टोबर सकाळी ११ वाजता श्रीरामपूर नगरपालिकेत रेल्वे खाते,नगर रचना आणि नगरपालिका अधिकाऱ्यांसमवेत बैठकीचे आयोजन..


श्रीरामपूर प्रतिनिधी:
रेल्वे प्रशासनाने श्रीरामपूर शहरातील रेल्वे लाईनच्या उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही कडील घर आणी दुकानदारांना जागा खाली करण्याबाबत नोटीसा धाडल्या आहेत,हे खुपच अन्यायकारक आहे, याविरुद्ध घर बचाओ संघर्ष समितीच्यावतीने आंदोलने हाती घेण्यात आली आहे.आज घर बचाओ संघर्ष समितीच्या वतीने शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिवराव लोखंडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी खा.लोखंडे यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून, समजून घेत त्यावर सविस्तर चर्चा केली.
यावेळी खासदार लोखंडे म्हणाले की, उद्या दि.९ ऑक्टोबर रोजी याविषयी श्रीरामपूर नगरपालिके मध्ये रेल्वे खाते,नगर रचना आणि नगरपालिका अधिकाऱ्यांसमवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.


याप्रसंगी घर बचाओ संघर्ष समितीचे आपण सर्व पदाधिकाऱ्यांनी आवर्जून उपस्थित राहावे असेही ते म्हणाले.

याप्रसंगी घर बचाओ संघर्ष समितीच्यावतीने खा.लोखंडे यांच्याशी अतिशय सखोलपणे गांभीर्याने चर्चा करण्यात आली. या चर्चेमध्ये हाजी अंजुमभाई शेख, प्रकाश चित्ते, हाजी मुक्तारभाई शाह,राजेश अलघ, दीपक चव्हाण ,नागेशभाई सावंत,अशोकभाई बागुल ,तिलक डुंगरवाल, जोएफ जमादार, कलीमभाई कुरेशी ,तौफिक शेख, रियाजखान पठाण,रज्जाकभाई पठाण, जाफरभाई शाह, महेबूब प्यारे, आशिष बोरावके, आयुबभाई कुरेशी आदींनी उपस्थित राहुन चर्चेत सहभाग नोंदवला.
उद्या सोमवार दि.९ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता श्रीरामपूर नगर पालिकेच्या सभागृहात होणाऱ्या मिटिंगसाठी संबंधित प्रकरणी सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे असे अवाहनही याप्रसंगी करण्यात आले.

सहयोगी:
सामाजिक कार्यकर्ते जाफरभाई शाह - श्रीरामपूर 
संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close