shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी देऊन अल्पयीन तरुणीचा विनयभंग करत जबरदस्तीने अपहरण चा प्रयत्न..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
गुरूवार दिनांक १९ ऑक्टोंबर २०२३

कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी देऊन अल्पयीन तरुणीचा विनयभंग करत जबरदस्तीने अपहरण चा प्रयत्न..!!

राहुरी : राहुरी शहरातील गोटुंबे आखाडा येथील एक अल्पवयीन मुलगी बाहेर गावातून आपल्या आत्या व बहिणीकडे शिक्षण घेण्यासाठी आली असता ती दोन वर्षांपासून राहुरीतील एका शाळेत शिक्षण घेत आह़े व ती तरुणी नेहमीप्रमाणे शाळेत जात असताना गोटुंबे आखाडा येथील राजन चंद्रकांत सुसे हा तरुण त्या अल्पवयीन तरुणीचा आपले वाहनातून पाठलाग करायचा व माझ्या मोबाईल  नंबर वर कॉल कर अन्यथा  तुझ्या बहिणीच्या पतीला जीवे ठार मारून टाकीन  अशी धमकी दिली.
गोटुंबे आखाडा येथील तरुणाचा शालेय अल्पवयीन तरुणीच्या  कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी देऊन पळविण्याचा प्रयत्न..!!

        सदरील तरुणीने या तरुणाच्या भीतीपोटी शाळेतील शिक्षकाच्या मोबाईल वरून त्या तरुणास कॉल केला असता त्या तरुणाने तू शाळेबाहेर ये अशी धमकी दिली ती तरुणी भीतीपोटी काही वेळानंतर शाळेबाहेर आली असता सदरील आरोपी राजन चंद्रकांत सूसे हा आपली ईरटीका  गाडी क्रमांक MH 17 AJ 5707 ही घेऊन शाळेबाहेर उभा होता ती तरुणी त्याच्या जवळ गेली असता तू माझ्या गाडीत बस म्हंटला परंतु माझे तास चालू असल्याचे या तरुणीने या तरुणास सांगितले परंतु राजन सूसे याने या तरुणीला धमकावत तू गाडीत बस आपल्याला बाहेर जायचे आह़े गाडीत न बसल्यास अन्यथा तुझे दाजी यांना जीवे मारण्याची धमकी या तरुणीला दिली व बळजबरीने गाडीत बसविले.  व त्याने आपली कार चालू करून राहुरी कॉलेजच्या दिशेने नेली व त्या तरुणीला सांगितले की आपल्याला पळून जायचे आह़े  परंतु तरुणीने त्या त्याला नकार दिला आरोपी राजन सूसे याला कुणाचा तरी कॉल आल्याने त्याने आपली कार राहुरी कॉलेज परिसरातून  मागे फिरविली व सदरील तरुणीस राहुरी बस स्टँड जवळील रिक्षा स्टँड वर सोडले. 


        त्यानंतर तरुणीने तिच्या बहिनीच्या पतीला दाजी ला कॉल करून राहुरीला बोलावून घेतले व घडलेल्या घटनेची आपबिती सांगितली त्यानंतर ही तरुणी राहुरी पोलीस स्टेशन येथे जाऊन त्या तरुणाच्या विरुध्द राहुरी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता 1860 नुसार 354 ड, 363, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आह़े. सदरील गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आह़े.

Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close