shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डीतील उपोषण मागे ना. विखेंचे आश्‍वासन : साई मंदिरे बांधण्यासाठी निधी देण्याचा निर्णय घेतला जाणार नाही


शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
 सामाजिक बातमी 

साई संस्थानने देशभर मंदिरे बांधण्यासाठी निधी देण्याचा निर्णय घेतला जाणार नाही व साई संस्थांनने असा निर्णय घेतलेला नसून शासनही त्यासाठी अनुमती देणार नाही. यासंदर्भात साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतलेला निर्णय हे त्यांचे व्यक्तिगत मत होते अशी स्पष्टोक्ती महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

शुक्रवारी सायंकाळी महसूलमंत्री विखे पाटलांनी शिर्डीत येऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, साईसंस्थानचे डेप्युटी सीईओ तुकाराम हुळवळे, प्रांताधिकारी माणिकराव आहेर, पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके, मुख्याधिकारी सतिष दिघे, निलेश कोते, विजय कोते, प्रमोद गोंदकर, गणेश गोंदकर, दत्ता कोते, मंगेश त्रिभुवन, विकास गोंदकर, मधुकर कोते आदींसह शिर्डीतील विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना विखे पाटील म्हणाले, मंदिर बांधण्यासंदर्भातील कोणताही निर्णय झाला नाही. तसेच साईसंस्थानची निर्णय क्षमता वाढवण्यासाठी लवकरात लवकर व्यवस्थापन मंडळ नेमण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचेही विखे पाटील यांनी सांगितले. मंदिरासंदर्भात मिळालेल्या आश्‍वासनानंतर माजी नगराध्यक्षा अनिता जगताप, माजी उपनगरध्यक्ष विजय जगताप व उपोषणात सहभागी झालेले यांनी महसुल मंत्री विखे पाटल यांच्या हस्ते लिंबुपाणी घेऊन उपोषण मागे घेतले.
भाविकांसाठी बनवण्यात आलेली दर्शनरांग येत्या विजरादशमीच्या मुहूर्तावर भक्तांसाठी खुली करण्यात येईल. लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधानांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र त्यांना वेळ नसेल तर ऑनलाईन पद्धतीने किंवा नंतर लोकार्पण सोहळा करू असेही मंत्री विखे पाटील यांनी जाहिर केले. यावेळी उपोषणकर्ते अनिता जगताप, विजय जगताप यांच्यासह उपस्थित नागरिकांनी साईसंस्थानचा कारभार, रूग्णालय, महाविद्यालयाची दुरवस्था, भाविकांच्या सोयीसुविधा, कर्मचार्‍रांचा प्रश्‍न याकडेही लक्ष वेधले. संस्थान सीईओची बदली करण्यात यावी तसेच संस्थानच्या घटनेतील तरतुदी प्रमाणे शिर्डी विकासाला संस्थानकडून निधी मिळावा अशी मागणीही करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादीचे युवा नेते अजित जगताप, मा चेअरमन आप्पासाहेब कोते, मा नगरसेवक अशोक राव गोंदकर ,भाजप नेते अशोक राव पवार, युवा नेते योगेश गोंदकर, मा चेअरमन तुषार  शेळके, व्हाईस चेअरमन दिनेश कानडे, सामाजिक कार्यकर्ते गफ्फार खान पठाण, भाजप नेते प्रमोद गोंदकर, युवा नेते नानासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.
close