shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रणसिंग महाविद्यालयात स्टार्ट अप क्रिएशन कार्यशाळा

रणसिंग महाविद्यालयात स्टार्ट अप क्रिएशन कार्यशाळा

इंदापूर प्रतिनिधि: कळंब ता. इंदापूर येथील विश्वासराव रणसिंग महाविदयालयात अंतर्गत गुणवत्ता कक्ष (आय क्यु ए सी) व वाणिज्य विभाग तसेच इनोवेशन अँण्ड इक्युबेशन  सेंटर आयोजित  स्टार्ट अप क्रिएशन (start-up Creation) या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेअंतर्गत महाविदयालयातील विद्यार्थी ने स्टार्ट अप (start up )अंतर्गत सुरू केलेल्या व्यवसायाची माहिती देण्यात आली .कार्यक्रमाचे प्रास्ताविकात डॉ.प्रशांत शिंदे यांनी विद्यार्थ्याना स्टार्ट अप ची संकल्पना सांगितली. व व्यावसायिक होण्याचे फायदे सांगितले.कार्यक्रमासाठी महाविदयालयात द्वितीय वर्ष वाणिज्य विभागातील विद्यार्थी यशराज निबाळकर याने महाविद्यालयात "धनी अँग्रो इंडस्ट्रीज" नावाची पनीर ला पर्यायी असा टोफू ( सोयाबीन पासून बनवलेले पनीर) च्या व्यवसायाची यशोगाथा विद्यार्थी पुढे मांडली. टोफू चे फायदे सर्वांना समजावून सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंकुश आहेर यांनी अशा कार्यक्रमांमधून विद्यार्थीना महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांच्या कलागुणांना वाव मिळत असल्याचे सांगितले विद्यार्थी यशराज निंबाळकर च्या व्यवसायाचे कौतुक केले. 
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा सोनाली चव्हाण यांनी  व आभार प्रा .राजलक्ष्मी रणसिंग यांनी केले.
कार्यक्रमाला महाविदयालयाचे प्राचार्य डॉ अंकुश आहेर व  आय क्यु एस सी ( IQAC ) चे समन्वयक  डॉ प्रशांत शिंदे व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा योगेश खरात महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

फोटो ओळ - कळंब ता. इंदापूर येथे स्टार्ट अप कार्यशाळा प्रसंगी उपस्थित मान्यवर
close