shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भोकर शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात शेळी गंभीर जखमी, पटारे कुटूंबीयांसह लगतचे शेतकरी मदतीला धावल्याने मोठा अनर्थ टळला


*चंद्रकांत झुरंगे - भोकर
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर शिवारातील पटारेवस्ती येथे घराजवळील एका शेतकर्‍याच्या मुक्त गोठ्याची जाळी तोडून आत प्रवेश करून एका शेळीवर हल्ला चढवत गंभीर जखमी केल्याने परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून या परीसरात वनविभागाने तातडीने पिंजरा लावून त्या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे.


सध्या भोकर परीसरात बिबट्याचा मोठ्या प्रमाणात उपद्रव सुरू आहे. परीसरातील शेतकर्‍यांना बिबट्याचे दर्शन हे नित्याचेच झालेले आहे. अनेकदा परीसरातील शेतकरी जीव मुठीत धरून शेतातील कामे करताना दिसत आहे. त्यातच गेल्या तेरा दिवसांपुर्वी दि.३ आक्टोबर रोजी भोकर शिवारातील जाधव वस्ती लगत वस्ती असलेले नजन यांच्या घरासमोर बांधलेल्या दोन शेळ्यांच्या नरडीचा घोट घेवून तिसरी गंभीर जखमी केली तीचा ही तीसर्‍या दिवशी मृत्यू झाला.एकंदरीत नजन यांच्या एकाच वेळी तीन शेळ्या मारल्याची घटना ताजी आहे.

त्यातच काल रवीवार दि.१५ आक्टोबर रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास भोकर शिवारातील भोकर- मुठेवाडगाव शिवेलगत गट नं.४४५ मधील संजय आसाराम पटारे यांच्या वस्तीवर या बिबट्याने तार कंपाऊंड असलेल्या मुक्त गोठ्यात कंपांऊंडची तार तोडून या बिबट्याने त्या मुक्त गोठ्यात प्रवेश करून पटारे यांच्या एका शेळीवर हल्ला चढविला परंतू हा प्रकार लक्षात आल्याने संजय पटारे कुटूंबियांसह शेळ्यांच्या गोठ्याकडे धावले व मोठा ओरडा केला या आवाजाने वस्तीवरील लगतचे शेतकरी ही धावल्याने त्या बिबट्याने शेळी टा़कून धुम ठोकली त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला म्हणजेच त्या गोठ्यातील इतर शेळ्या बचावल्या.
हि घटना वनविभागास कळवत या परीसरात तातडीने पिंजरा लावून आमचं पशुधन वाचवा अशी आर्त मागणी या परीसरातील शेतकर्‍यांनी केली. हि घटना घडून चोविस तास उलटून ही वन विभागाने या वस्तीवर भेट दिली नाही किंवा या कुटूंबाला आधार देण्याचा ही प्रयत्न न केल्याने परीसरातील शेतकर्‍यांत वनविभागाच्या कारभाराबद्दल मोठी नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.


*सहयोगी:
पत्रकार अमन सय्यद - बेलापूर 
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close