shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अशोकनगर पोलीस चौकीच्या वतीने उत्कृष्ठ गणेश मंडळांचा सन्मान सोहळा संपन्न


इम्रान शेख - श्रीरामपुर:
येथील शहर पोलीस स्टेशन अंकीत अशोकनगर पोलीस चौकी हद्दीमध्ये निपाणी वडगांव, शिरसगांव, वडाळा महादेव, मातापुर, ब्राम्हणगांव वेताळ व अशोकनगर अशा गावांमध्ये सार्वजनिक गणेश उत्सवात एकुण ३४ गणेश मंडळानी सहभाग घेवुन गणेश स्थापना केली होती. सदर मंडळांना प्रोत्साहन देण्याकरीता पोलीस प्रशासन व गणेश मंडळ यांचेत समन्वय राहुन कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी. तसेच गणेश मंडळांच्या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत त्यांचे हातातून चांगले कार्य व्हावे.

या करीता अशोकनगर पोलीस चौकीकडुन प्रथम ०३ उत्कृष्ट मंडळ व ०३ उत्तेजनार्थ मंडळाची निवड करुन त्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्याची संकल्पना राबविण्यात येते. तसेच ज्या गणपती मंडळानी प्रशासनाची परवानगी घेणे, तसेच शासनाच्या घालून दिलेल्या अटी शर्तीचे पालन करुन प्रशासनास सहकार्य केल्याबद्दल त्यांना देखील प्रमाणपत्र देण्यात येते.
सार्वजनिक गणेश उत्सव सन २०२३ मध्ये उत्कृष्ट सार्वजनिक काम केल्याबाबत त्यांचा सन्मान सोहळा दि. ३० (सप्टेंबर) रोजी  अशोकनगर पोलीस चौकी हरेगांव फाटा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे व श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचे शुभहस्ते उत्कृष्ट काम करणा-या गणेश मंडळांना पारितोषिके वितरण करण्यात आले. त्यामध्ये प्रथम क्रमांक जयदंबा माता मित्र मंडळ, अशोकनगर, द्वितीय क्रमांक लक्ष्मीमाता मित्र मंडळ, लक्ष्मीनगर, वडाळा महादेव, तृतीय क्रमांक शिलोदा मित्र मंडळ निपाणी वडगांव, उत्तेजनार्थ क्रमांक १ अष्टविनायक मित्र मंडळ शिरसगांव, उत्तेजनार्थ क्रमांक २ मंगलमुर्ती बाल गणेश मंडळ, मातापुर व उत्तेजनार्थ क्रमांक ३ राजे शिवछत्रपती मित्र मंडळ निपाणी वडगांव यांना सन्मानित करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमास अशोकनगर बीट हद्दीतील सर्व गावांमधील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, सर्व गणपती मंडळाचे पदाधिकारी आवर्जून उपस्थित राहीले आहेत. 
सदर मंडळांनी यापुढे देखील अशाच प्रकारे शासनाचे ठरवून दिलेल्या सुचना व नियमांचे काटेकोरपणे पालन करत धार्मिक कार्यक्रम साजरे करुत सार्वजनिक शांतता अबाधित ठेवण्याचे काम करेल, यांना पोलीस प्रशासनाकडुन अशाच प्रकारे सन्मानित करण्यात येईल असे यावेळी आश्वाशित केले.

सदर गणेश मंडळ सन्मान सोहळा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी,  यांचे प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली तसेच अशोकनगर पोलीस चौकीचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक दादाभाई मगरे, पोहेकॉ. संतोष परदेशी, पोना. मच्छिंद्र शेलार, पोना. किरण टेकाळे, पोकों. वसीम इनामदार, पोकों. प्रविण कांबळे, होमगार्ड राजेंद्र देसाई यांनी आजोजित केला होता. त्यास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close