श्रीरामपूर प्रतिनिधी:
अशोक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले अशोक आयडियल स्कूलची (सी.बी.एस.ई.) विद्यार्थिनी कु.ज्ञानश्री नंदकुमार लांडगे हिने ३० मीटर आर्चरी प्रकारामध्ये यश मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच ४० मीटर अंतराच्या इंडियन बो या प्रकारात तिने देशात द्वितीय क्रमांक पटकावला. तिची आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेकरिता निवड झाल्याबद्दल माजी आ. भानुदास मुरकुटे यांचे हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला.
राष्ट्रीय खेळ परिषद अंतर्गत राजीव गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, दिल्ली येथे सदर स्पर्धेचे आयोजन केले होते. यापूर्वीही कु.ज्ञानश्री लांडगे हिने राज्य पातळीवर पारितोषिके मिळवली आहेत. खेळाच्या माध्यमातून आपण आपले अस्तित्व निर्माण करू शकतो, अशी प्रेरणा श्री.मुरकुटे हे नेहमी विद्यार्थ्यांना देत असतात. हीच प्रेरणा घेऊन कु.ज्ञानश्री लांडगे ही विद्यार्थीनी आज राष्ट्रीय पातळीवर खेळत आहे. अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कार्यकारी अधिकारी सौ. मंजुश्रीताई मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक आयडियल स्कूल नेहमी विद्यार्थ्यांच्या बाबतीत विविध खेळांमध्ये प्रयत्नशील राहून यश संपादन करत आहे.
कु.ज्ञानश्री लांडगे हिचे यशाबद्दल अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आ. भानुदास मुरकुटे, व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे, अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडीराम उंडे, उपाध्यक्ष योगेश विटनोर, सचिव सोपानराव राऊत, कार्यकारी अधिकारी सौ.मंजुश्रीताई मुरकुटे, ॲग्रो इंडस्ट्रीज एज्युकेशन व डेव्हलपमेंट फाउंडेशनचे उपाध्यक्ष बाबासाहेब आदिक, सचिव विरेश गलांडे, अशोक बँकेचे चेअरमन ॲड्.सुभाष चौधरी, व्हा. चेअरमन भाऊसाहेब हाळनोर, कारखान्याचे संचालक मंडळाने अभिनंदन केले आहे. कु.ज्ञानश्री हिस स्कूलचे प्राचार्य रईस शेख व क्रीडा शिक्षक आसिफ पठाण यांचे मार्गदर्शन लाभले.
संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111