*पाटणी विद्यालयाच्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम
श्रीरामपूर प्रतिनिधी:
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल नुकताच जाहीर केला यामध्ये शां.ज. पाटणी विद्यालयाचा आशुतोष अक्षय मुळे यांनी 98.20% गुण प्राप्त करून तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला.विद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली असल्याचे प्रतिपादन विद्यालयाचे चेअरमन भरत कुंकूलोळ यांनी केले.
द्वितीय क्रमांक चि. अथर्व नवनाथ बर्डे 95.60%, तृतीय क्रमांक चि. सार्थक गजानन धुमाळ 95.20 %, चि. कृष्णा नितीन हारदे 93.20 % चि. जय रमेश कोळेकर 92.60% चि.सार्थक बाबासाहेब हळनोर 90.40 % चि. प्रणव रामनाथ मंडलिक ९०.४०% चि. पृथ्वीराज सुरेश कळकटे 90% धनश्री खंगार 86.40 गुण मिळून मुलींमध्ये विद्यालयामध्ये प्रथम क्रमांक मिळवला. या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश प्राप्त केले आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. सत्काराला पालक विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक उपस्थित होते. विद्यालयाच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, संस्थेचे मानद सचिव संजय जोशी, कार्याध्यक्ष ॲड अनंत फडणीस, उपाध्यक्ष रवींद्र गुलाटी, सहसचिव अनिल देशपांडे, रणजीत श्रीगोड,अशोक उपाध्ये विद्यालयाचे चेअरमन भरत कुंकूलोळ, मुख्याध्यापक विठ्ठल भांगरे, पर्यवेक्षिका मंगला डोळस,स्कूल कमिटी सदस्य आशिष धनवटे आदींनी अभिनंदन केले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.यशस्वी विद्यार्थ्यांना रश्मी कासार,अनुप्रीती पवार, उर्मिला पुजारी व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
*पत्रकार अफजल मेमन, श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - 9561174111