मुंबई:-
डॉ बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र रत्नागिरी भारत रजि.व आम्ही भारतीय सोशल फाउंडेशन बेल्हे यांच्या वतीने राज्यस्तरीय ग्रामीण कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते,या कविसंमेलनाला जेष्ठ साहित्यिक राष्ट्रपती पुरस्कार विजेते डॉ खं र माळवे-खरमा हे अध्यक्ष लाभले होते.तसेच प्रमुख अतिथी म्हणून तमासगिर रघुवीर खेडकर, तमासगिर बाळासाहेब सोनवणे, वसंतराव जगताप,विलास अटक,मनोज जाधव,भावना खोब्रागडे, राजेंद्र पिंगट(उपसरपंच),विजय गुंजाळ,गोरक्षनाथ वाघ, दिपाली मोटाले,ई मान्यवर उपस्थित होते,रघुवीर खेडकर यांनी शुभेच्छा देताना सांगितले की कवी लेखक हा कला क्षेत्राचा कणा आहे तमाशाशी निगडित असलेल्या कवींची माहिती दिली,
कवी डॉ खं र माळवे-खरमा यांची गाणी चित्रपट लघुपटात आहे यांची नोंद घेत या दोन्ही संस्थाच्यावतीने किसनराव देशमुख यांना समाजभूषण व गंगाधर साळवे यांना यांना कलारत्न पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले,तसेच मनोज जाधव सर भावना खोब्रागडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.जयद्रथ आखाडे,शब्दस्वरा मंगरूळकर,बाबजी सिरतकर,शितल भगत,पुजा सोनवणे,कैलास औटी,सचिन औटी,नवनाथ शिरतकर,अप्पा मुलमुले,सावरकर पिंगट,नाना घोडे,पाराजीशेठ,बोरचटे,सागरशेट,मालखडे,राजेंद्र गफले,भद्रिगे आळेकर,यांचे विषेश सहकार्य लाभले,जवळपास नोंदनीनुसार ३४च्या वर कविंच्या कविता व स्थानिक सहभागी १५० कविंच्या विविध विषयांवर कविता यावेळी सादर केल्या अध्यक्षिय भाषणात डॉ खंडू माळवे म्हणाले की कवी हा सर्वसामान्यांचा प्राण आहे. कविता ही नवं उभारी देते जीवन समृध्द करते, दु:खावर फुंकर घालते.छोट्यामोठ्या संघटना कवीसंमेलनातून,काव्यसंमेलनातून देशाला घडविण्याचे काम करतात.असे मनोगत व्यक्त करीत सर्व कविंचा ट्राफी व सन्मानपत्र,अधिक गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.या संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा सतिश शिंदे(उद्याचा शिलेदार) तसेच गझलकार प्रतिभा शिंदे यांनी केले तर आम्ही भारतीय सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अल्पेशभाऊ सोनवणे यांनी उपस्थित सर्व स्नेही जनांचे आभार मानले.