शौकतभाई शेख / श्रीरामपूर
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी सौ. दिपालीताई करण ससाणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.तीन वर्षांपूर्वी पार पडलेल्या प्रदेश युवक काँग्रेसच्या निवडणुकीमध्ये सौ. ससाणे मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या होत्या. त्यानंतर इंदिरा फेलोशिप, भारत जोडो यात्रा शक्ती - सुपर सी, युथ जोडो अभियान,महिला बचत गटांना आर्थिक साहाय्य मिळवून देणे. महिला रास दांडिया चे भव्य आयोजन करून महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले. हळदी - कुंकू, वट सावित्री यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन करून महिलांचे एकीकरण केले.
तसेच महिला भगिनींना प्रोत्साहित करून काँग्रेस पक्षाची विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य सौ.ससाणे यांनी केल्यामुळे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रभारी कृष्णा अल्लवारूजी, अध्यक्ष बी.व्ही. श्रीनिवासजी, महाराष्ट्र प्रभारी उदय भानुजी, शक्ती- सुपर सी अभियानाच्या राष्ट्रीय प्रभारी रिची भार्गवजी, महाराष्ट्र सहप्रभारी एहसान खान, रोहित कुमार, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी सौ. ससाणे यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र प्रदेश युवा काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड केली.
यावेळी सौ. ससाणे म्हणाल्या की माजी आ. स्व. जयंतरावजी ससाणे यांच्या 'सबका भला सोच' याच तत्त्वानुसार महिला व सर्वसामान्यांसाठी काम करणार असून अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष, विरोधी पक्ष नेते खा.राहुलजी गांधी यांच्या मार्गदर्शनाने पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार आहे. सौ.ससाणे यांच्या निवडीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, माजी मंत्री. आ. बाळासाहेब थोरात, माजी आ.डॉ. सुधीर तांबे, श्रीरामपूर नगर पालिकेच्या माजी नगराध्यक्षा राजश्रीताई ससाणे, जिल्हा बँकेचे संचालक, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यावेळी जि. प. चे माजी सभापती बाबासाहेब दिघे, माजी नगराध्यक्ष संजय फंड, काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुधीर नवले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक, नगरसेवक, श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस, स्व. जयंतराव ससाणे मित्र मंडळ, श्रीरामपूर शहर काँग्रेस, युवक काँग्रेस,महिला काँग्रेस, काँग्रेसच्या सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांनी सौ.ससाणे यांच्या निवडीबद्दल अभिनंदन केले.
वृत्त विशेष सहयोग,
पत्रकार अफजल मेमन, श्रीरामपूर, - संकलन,समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - 9561174111